मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असते. ती सातत्याने तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो काही वेळातच व्हायरल होतात. असंच नुकतंच तिने इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर एक प्रश्न शेअर केलाय. या प्रश्नामुळे मोठी चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साराने तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर एक प्रश्न विचारला आहे. यामध्ये तिने, आम्ही जुळ्या भावंडांसारखे दिसतो का? अशा प्रश्न केला आहे. 


खरं तर, सारा तेंडुलकरची पोस्ट पाहून असं दिसतंय की, ती आणि भाऊ अर्जुन तेंडुलकर यांच्यात नेहमीच वाद होत असतो कारणंदोघेही एकसारखे दिसतात. यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की दोघं जुळे आहेत का? अखेर या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सारा तेंडुलकरने लोकांकडूनच मत मागवली आहेत.



साराने तिच्या प्रश्नासोबत दोन पर्यायही दिले आहेत. यामध्ये पहिला पर्याय- जुळे आणि दुसरा आहे - नाही. याशिवाय साराने काही फोटोही शेअर केले आहेत. यापैकी एकामध्ये सुर्यकिरणांसोबत तिचा फोटो दिसून येतो.