मुंबई : SARA TENDULAKAR:  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर सोशल मीडिया सेन्सेशन आहे. फक्त सारा ही लोकप्रिय नाही तर तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरही तितकाच लोकप्रिय आहे. सारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. रक्षाबंधन जवळ आलं असून सारानं अर्जुननं तिला काय भेट वस्तू दिली हे सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सारानं हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्यासोबत तिची हिरव्या रंगाची हॅन्ड बॅग दिसत आहे. हे फोटो शेअर करत सारानं रक्षाबंधनच्या आधी दिलेल्या भेट वस्तूबद्दल धन्यवाद धाकट्या भावाचे म्हणजेच अर्जुनचे आभार मानले आहे. 



सारा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल अशा चर्चा तर होत आहेत. मात्र अद्याप तरी तशी काही ठोस माहिती नाहीये, पण सारा तेंडुलकर मॉडेलिंगमध्ये खूप सक्रिय आहे. वेगवेगळे फोटो ती सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करताना दिसते. नुकताच साराचा ब्रायडल, गुलाबी लेहेंग्यावरचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता ज्यात सारा एखाद्या नववधूप्रमाणे सुंदर दिसत होती. 


सारा बऱ्याचदा लंडन आणि मुंबईत येत-जात असते, तिथले काही फोटो ती अपलोड करते. या सर्व फोटोंमध्ये पाहिलं तर सारा तेंडुलकर कोणत्याही बॉलीवूड स्टारपेक्षा कमी नाहीये. साराचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियनपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.