मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सध्या सोशल मीडिया आयकॉन बनली आहे. सारा सोशल मीडियावर फारच ऍक्टीव्ह असते. हल्लीच साराने मॉडलिंगच्या जगात पाऊल ठेवलं आहे. त्यानंतर मात्र तिच्या संदर्भातील चर्चांनी जोर धरला. सारा तेंडुलकर एक प्रसिद्ध तरुण व्यक्तिमत्व बनली आहे. ज्यामुळे ती काय करते? कुठे जाते? कोणाला भेटते? हे जाणून घेणे लोकांना फार आवडते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सारा तेंडुलकरचा एक फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एक व्यक्ती तिला मिठी मारताना दिसत आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यापासून तेंडुलकरला हा मिठी मारणारा व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत.


व्हायरल होत असलेले साराचा फोटो आणि व्हिडीओ एखाद्या रेस्टॉरंटमधील असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये लोक मोठ्या संख्येने आहेत. त्याचवेळी एक खास व्यक्ती साराकडे पाहते, मग दोघेही हसतात आणि मग ती व्यक्ती साराला मिठी मारते.


साराचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा युवा क्रिकेटर शुभमन गिल याचे नाव सर्वांच्या ओठावर येऊ लागला आहे. खरे तर सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या कथित नात्याची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्याही मीडियात आल्या होत्या.


साराचा व्हायरल फोटो पाहून लोकांना ती व्यक्ती शुभमन गिल वाटत असला तरी ती व्यक्ती शुभमन गिल नसुन तो वनराज झवेरी  (vanraj zaveri ) आहे. वनराज झवेरी जावोरचे सीईओ आहे. जावोर ही दागिन्यांची कंपनी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, वनराज झवेरी सारासोबत काय करतोय. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, वनराज आणि त्यांची पत्नी दोघेही सारा तेंडुलकरचे खूप चांगले मित्र आहेत आणि हा व्हिडीओ ते पार्टी करतानाचा आहे.