मुंबई : आयपीएलच्या यंदाचा सिझन आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. शनिवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात मुंबईने विजयाने अंतिम सामना संपवला. मुंबई जरी जिंकली असली तरीही टीमचे चाहते मात्र काही प्रमाणात नाराज होते. या नाराजीचं कारण होतं ते म्हणजे, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) प्लेईंग इलेव्हेनमध्ये समावेश केला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 वर्षीय अर्जुनचा दिल्ली विरूद्धच्या सामन्यात समावेश होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र शेवटच्या सामन्यातंही त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. दुसरीकडे चाहत्यांप्रमाणे कदाचित अर्जुनची बहिण सारा तेंडुलकरनेही त्याचा डेब्यू होणार असल्याची आशा केली होती.


सारा तेंडुलकर तिचा भाऊ अर्जुनला तेंडुलकरला सपोर्ट करण्यासाठी मुंबई इंडियन्सची जर्सी घालून स्टेडियममध्ये दिसली. यावेळी स्टँडमध्ये बसलेल्या साराचं लक्ष अर्जुनकडेच होतं. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात अर्जुन खेळला नाही मात्र, बाऊंड्री लाईनजवळ त्याला 1-2 वेळा स्पॉट करण्यात आलं.



यावेळी अर्जुन तेंडुलकर पाण्याची बाटली घेऊन जाताना दिसला. साराने स्टँडवरूनच अर्जुनचा व्हिडिओ बनवला. सारा तेंडुलकरनेही तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केलाय. या अर्जुनचा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच तिने भावाला प्रोत्साहन देण्याचं कामंही केलंय.


साराने अर्जुनचे 2 व्हिडिओ पोस्ट करत त्यात रणवीर सिंगचे प्रसिद्ध गाणं 'अपना टाइम आएगा'चा उल्लेख केला. साराने या गाण्याद्वारे भावाला प्रोत्साहन देण्याचं काम केलंय. यासोबत तिने स्वतःचा एक सुंदर फोटोही पोस्ट केला. यासोबतच पुढच्या वेळेची प्रतीक्षा करा, असं कॅप्शनंही तिने दिलंय.