मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. सारा तेंडुलकर तिच्या सुंदर फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सारा सौंदर्याच्या बाबतीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सारा खूपच सुंदर दिसतेय.


नव्या लुकमध्ये दिसली Sara Tendulkar


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. सारा तेंडुलकरचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. नुकतंच साराने पांढऱ्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. 
या फोटोजमध्ये ती खूपच सुंदर दिसते. साराने हे फोटो स्टेटसवरही टाकलेत. एका फोटोवर साराने लिहिलंय, स्मायली ट्युसडे.



सारा तेंडुलकर तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये खूपच छान दिसतेय. तिचा पांढरा ड्रेस आणि स्मित हास्य यामुळे तिचा फोटो अजून खुलुन दिसतोय. दरम्यान सारा तेंडुलकर तिच्या फोटोमध्ये मेकअप करताना दिसतेय. अशातच युझर्सने सारा कोणासाठी इतकी तयार होत असल्याचा प्रश्न केला आहे.


सारा तेंडुलकरने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. यानंतर ती बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवू शकते अशी अटकळ बांधली जात होती. पण, तरीही ती इंडस्ट्रीपासून दूर आहे. जरी तिने अनेक मोठ्या ब्रँडसाठी फोटो शूट केलं आहेत.