Sara Tendulkar : ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत ( Ind vs Aus ) यांच्यामध्ये सध्या 3 सामन्यांची वनडे सिरीज सुरु आहे. यामध्ये पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) तुफान खेळी करत ऑस्ट्रेलियाचा ( Australia Team ) धुव्वा उडवला. यामध्ये टीम इंडियाचा ( Team India ) स्टार खेळाडू शुभमन गिलने विजयात मोलाची भूमिका बजावली. शुभमनने 63 बॉल्समध्ये 74 रन्सची खेळी केली. दरम्यान शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची ( Team India ) मुलगी सारा तेंडुलकरसोबत ( Sara Tendulkar ) जोडलं जातं. अशातच साराच्या अकाऊंटवरून शुभमनला ( Shubman Gill ) शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 


शुभमन गिलसाठी सारा तेंडुलकरने केलं ट्विट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा ओपनर आणि प्रिन्स शुभमन गिल ( Shubman Gill ) त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. गेल्या काही काळापासून तो टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतच्या ( Sara Tendulkar ) कथित अफेअरमुळे चर्चेत आहे. अनेक महिन्यांपासून या दोघांचं अफेअर असल्याची चर्चा रंगली होती. 


दरम्यान ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यानंतर एक ट्विट व्हायरल होतंय. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या अकाऊंटचं नाव सारा ( Sara Tendulkar ) आहे. मात्र हे सारा तेंडुलकरचं ( Sara Tendulkar )अधिकृत अकाऊंट नाहीये. ट्विटरवर सारा तेंडुलकरच्या नावाने बनवलेले बनावट अकाऊंट असून त्या माध्यमातून हे ट्विट करण्यात आलंय. यामध्ये लिहिलंय की, “खूप छान खेळलास शुभमन गिल ( Shubman Gill ) ( Shubman Gill ) आणि टीम इंडियानेही चांगली कामगिरी केली.”



Shubman Gill-Sara Tendulkar चं झालं ब्रेकअप?


सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) नावाने असलेल्या या अकाऊंटवरून 22 सप्टेंबर रोजी तीन सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर हे ट्विट केलं होतं. टीम इंडियाने मोहालीच्या मैदानावर पाच विकेट्सने शानदार विजय मिळवला होता. दरम्यान गेल्या काही काळापासून सारा आणि शुभमन यांच्या अफेअरची चर्चा आहे. मात्र दोघांनीही एकमेकांना डेट करण्याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही.