भारताच्या `या` स्टार खेळाडूचा भीषण अपघात; कार चार-पाच वेळा पलटली, महत्त्वाच्या सामन्याला मुकणार
Sarfaraz Khan brother Musheer Khan: भारत-बांगलादेश कसोटी मालिकेदरम्यान क्रिकेट जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियामधील एका खेळाडूचा रस्ते अपघात झाला आहे.
Musheer Khan, Irani Cup: टीम इंडियाच्या एका खेळाडू संदर्भात एक वाईट बातमी समोर आली आहे. भारताचा युवा फलंदाज मुशीर खान रस्ता अपघातात जखमी झाला आहे. मुशीर खान हा टीम इंडियाचा बॅट्समन सरफराज खानचा भाऊ आहे. मुशीर खान आणि त्याचे वडील नौशाद खान आझमगडहून लखनौला जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो इराणी चषक सामन्यासाठी कानपूरहून लखनौला जात होता. रिपोर्ट्सनुसार, या अपघातानंतर त्याला फ्रॅक्चर झाले. मुशीरची इराणी चषक २०२४ साठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघात निवड झाली आहे.
काय आहे हेल्थ अपडेट?
अपघातानंतर मुशीरच्या मानेला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. या दुखापतीमुळे मुशीरला किमान सहा ते तीन महिने टीम बाहेर राहावं लागण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रस्त्यावर चार ते पाच वेळा कार उलटल्याने मुशीर आणि त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. मुशीर आणि त्याचे वडील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मुशीरचा खेळ
मुशीरने रेड बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने भारत अ विरुद्ध भारत ब संघाच्या विजयात १८१ धावा केल्या. १९ वर्षीय मुशीरची प्रथम श्रेणीत सरासरी ५१.१४ आहे. त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.
इराणी चषक २०२४
लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर १ ऑक्टोबरपासून होणार आहे. यामध्ये रणजी चॅम्पियन मुंबईचा सामना शेष भारताच्या संघाशी होणार आहे. आता या अपघातानंतर मुशीर रणजी ट्रॉफीच्या पहिल्या काही सामन्यांपासूनही दूर राहणार आहे. मुशीर मुंबईसाठी क्रिकेट खेळतो आणि त्याची इराणी कपसाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघात निवड झाली आहे.
इराण चषकासाठी कसा आहे संघ?
मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्याश शेडगे, सिद्धांत अधातरू, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठकवा, शार्दुल ए. मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन डायस.
रेस्ट ऑफ इंडिया: रुतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इसवरन (उपकर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, मानव सुथार, सरांश जैन, प्रसीद कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल , रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर.