IND vs WI, Sarfaraz Khan: आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या वनडे आणि टेस्ट टीमची घोषणा करण्यात आलीये. आता टीमच्या निवडीवरून प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहेत. अशातच आता रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंना संधी मिळत नसल्याची टीका होताना दिसतीये. टीम इंडियाचे दिग्गज सलामीवीर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी बीसीसीआयवर (BCCI) सडकून टीका केली होती.  देशातंर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या 2 खेळाडूंची निवड झालेली नाही, त्यावरून त्यांनी खडेबोल सुनावले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियामध्ये संधी शोधत असलेल्या सरफराज खान (Sarfaraz Khan) याला संघात स्थान न मिळाल्याने त्याने राग व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडल्यानंतर सरफराजचा हिरमोड झालाय. त्याने आपल्या अंदाजात यावर आपली प्रतिक्रिया दिली. सरफराज खानने इंस्टाग्राम स्टोरीवर (Sarfaraz Khan Instagram Story) एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने सिलेक्टर्सवर निशाणा साधला आहे. यामध्ये त्याची आकडेवारी दिसून येतीये. त्याची ही स्टोरी सध्या तुफान चर्चेत असल्याचं दिसून येतंय.


आणखी वाचा - लेकाची टीम इंडियामध्ये निवड झाली अन् पाणीपुरी विकणारा बाप ढसाढसा रडला!


सरफराज खानने (Sarfaraz Khan) इंस्टाग्राम स्टोरीवर नेट्सचा फोटोही शेअर केला आहे. त्यात त्याने एकच प्रेम असं कॅप्शन दिलंय. त्याला लक्ष्य सिनेमातील टाय़टल साँग देखील ऐकायला मिळतंय. 25 वयाच्या सरफराजची धुंवाधार आकडेवारी दाखवून सरफराज नेमकं काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय? असा सवाल नेटकरी विचारताना दिसत आहेत.


पाहा स्टोरी



दरम्यान, सरफराजने 37 सामन्यातील 54 डावात 79.65 च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) सामन्यात खोऱ्याने धावा ओढल्या होत्या. त्यामुळे सुनील गावस्कर यांसारखे दिग्गज देखील सरफराजच्या पाठीशी असल्याचं दिसतंय.


काय म्हणाले सुनील गावस्कर?


सरफराज खानने गेल्या तीन मोसमात शंभरच्या सरासरीने रणजी स्पर्धेत धावा केल्या आहेत. भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी एखाद्या खेळाडूने यापेक्षा अधिक काय करायला हवं. कदाचीत त्याला अंतिम संघात स्थान देणे शक्य होणार नाही. त्याची संघात निवड करायला काय हरकत आहे, असं सुनील गावस्कर म्हणाले आहेत.