Sarfaraz Khan On Ind vs Ban Test : तब्बल 5 आठवड्याच्या विश्रांतीनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी कोणत्या खेळाडूंची निवड होणार? याकडे आता सर्वांच लक्ष लागवलं आहे. यामध्ये टीम इंडियाचा युवा फलंदाज सरफराज खान याचं नाव येणार की नाही? असा सवाल विचारला जात आहे. सरफराज खानने इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेच पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता रोहित शर्मा पुन्हा युवा खेळाडूंवर विश्वास ठेवणार का? अशी चर्चा होताना दिसते. अशातच सरफराज खान याने मोठं वक्तव्य केलंय.


काय म्हणाला सरफराज खान?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला बांगलादेश कसोटी मालिकेदरम्यान भारतीय संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा नाही. पण मला संधी मिळाली तर मी नेहमीप्रमाणे टीमसाठी सर्वस्व देण्यासाठी तयार असेल. काही खेळाडूंना लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळते. माझ्या बाबतीत असे घडले नाही, असं म्हणत सरफराजने नाराजी देखील बोलून दाखवली आहे. मी अधिक देशांतर्गत क्रिकेट खेळलो, याचा फायदा मला पदार्पणाच्या मालिकेमध्ये झाला, असंही सरफराज खान म्हणतो.


सध्या माझं लक्ष्य फक्त बुची बाबू क्रिकेट टूर्नामेंटमध्ये अधिकाधिक धावा करणं इतकंच आहे. त्यामुळे मी अधिक अपेक्षा करू शकत नाही. मी सकाळी दररोज 4.15 ला उठतो आणि 4.30 वाजता मी माझा व्यायाम सुरू करतो. सकाळी 5 किलोमीटर पळण्यापासून माझा दिवस सुरू होतो. रनिंग झाल्यानंतर मी जीमला जातो आणि घाम गाळतो. त्यानंतर क्रिकेटची प्रॅक्टिस करून पुढचा माझा दिवस सुरू होतो, असं सरफराजने सांगितलं. 


बांगलादेशविरुद्ध असं असेल वेळापत्रक 


भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला सामना हा 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर रोजी एमए चिदंबरम स्टेडियम खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर यावेळेत कानपूरमध्ये खेळवला जाईल. 


बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, सरफराज खान, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, शिवम दुबे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.