सरफराज Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद; Video पाहून तुम्हीच सांगा!
PAK vs NZ: अंपायरने निर्णयामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. स्पष्ट चित्र दिसत असताना (Big controversy over the umpire`s decision) अंपायरने असा निर्णय दिलाच कसा?, असा सवाल विचारला जातोय.
Sarfaraz Ahmed controversial dismissal: पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ, 2nd Test) यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान पाकिस्तान न्यूझीलंडला (New Zealand) कडवी टक्कर देत असल्याचं पहायला मिळतंय. न्यूझीलंडने दिलेल्या 449 धावांचं आव्हान पार करताना पाकिस्तान (Pakistan) टीमने 5 गड्यांच्या बदल्यात 371 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानचं वर्चस्व कायम राहिल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि विकेटकिपर फलंदाज सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याची विकेट चर्चेत आली आहे. (Sarfaraz Out or Not Out? Big controversy over the umpire's decision in 2nd PAK vs NZ Test marathi news)
साऊद शकीलने (Saud Shakeel) ठोकलेल्या दमदार शतकाच्या जोरावर पाकिस्ताने 300 कॉस केलं. शकीलला दुसऱ्या बाजूला सरफराज अहमदने मोलाची साथ दिली. उमरान उल हकने (Imam-ul-Haq) सुरूवातीला चांगली कामगिरी केल्यानंतर कॅप्टन बाबर (Babar Azam) देखील फेल राहिला. त्यानंतर सरफराज अहमदने योग्यवेळी संघाला खांदा दिला.
शकीलला साथ देत सरफराजने 109 बॉलमध्ये 78 धावांची खेळी केली. त्यात त्याने 10 चौकार देखील खेचले. सरफराज देखील शतक ठोकणार, असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र, अंपायरचा एक निर्णय आणि सफरराजच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं. पाकिस्तानच्या डावात सरफराज अहमद आणि साऊद शकील दमदार भागीदारी करत खेळत होते. डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) 100 वी ओव्हर करण्यासाठी आला होता.
आणखी वाचा - IND vs SL: कॅप्टन पांड्या खेळणार की नाही? दुखापतीवर मोठी अपडेट समोर, हार्दिक म्हणतो...
मिशेलच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सरफराज थोडासा पुढे आला, मात्र त्याचा निशाणा चुकला. तो नुकताच क्रीझवर परतत असताना विकेटकीपर ब्लंडेलने बेल्स उडवले. यानंतर प्रकरण थर्ड अंपायरकडे (controversy over the umpire's decision) गेलं आणि बराच वेळ घेतल्यानंतर अंपायरला जामीन काढताना सरफराजचा पाय हवेत असल्याचं दिसून आलं.
पाहा Video -
दरम्यान, सरफराजचा पाय हवेत नव्हता, हे दुसऱ्या कॅमेऱ्यामधून दिसून येतंय. मात्र, त्यामुळे अंपायरने निर्णयामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. स्पष्ट चित्र दिसत असताना अंपायरने असा निर्णय दिलाच कसा?, असा सवाल विचारला जातोय. त्यामुळे आता सरफराज Out की Not Out? नेमकी चूक कोणाची ? अंपायरची की सरफराजची? असा सवाल आता ट्विटरवर विचारला जात आहे.