नवी दिल्ली : केंद्र सरकार योगाचे महात्म्य सांगत असतानाच सौदी अरेबियाने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सौदी अरबमध्ये यापुढे योग हा केवळ शारीरिक व्यायाम प्रकार राहणार नसून, तो एक क्रीडा प्राकर म्हणून ओळखला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौदी अरेबियातील ट्रेड अॅण्ड इंडस्ट्री मिनिस्ट्रीने स्पोर्ट अॅक्टीव्हीटीच्या रूपात योगा शिकवायला अधिकृत मान्यता दिली आहे. इतकेच नव्हे तर, योगाला सौदीने क्रीडा प्रकार म्हणूनही मान्यता दिली आहे. त्यामुळे सौदी अरबमध्ये आता विशिष्ट परवाना घेऊनच योग शिकवता येणार आहे.


विशेष असे की, नोफ मारवाई नावाच्या महिलेला सौदी अरेबियातील पहिली योग शिक्षीका म्हणून मान्यताही मिळाली आहे. योगाला क्रीडा प्रकार म्हणून सौदीत मान्यता मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे श्रेयही नोफलाच जाते. योगाला खेळाचा दर्जा मिळण्यासाठी नोफने प्रदीर्घ काळ एक अभियान चालवले होते. अरब योगा फाऊंडेशनची संस्थापक असलेल्या नोफचे म्हणने असे की, योगा आणि धर्म यांच्यात कोणत्याही प्रकारची गल्लत होऊ नये.


दरम्यान, 27 सप्टेबर 2014ला संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत योगाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. तसेच, प्रत्येक वर्षाच्या 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.