Argentina Vs Saudi Arabia FIFA World Cup 2022: सर्वांना प्रतिक्षा असलेल्या फिफा वर्ल्डकपला (FIFA World Cup 2022) धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. क गटातील दोन संघ अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया यांच्यात (ARG vs KSA) सामना खेळला गेला. या सामन्याचा आश्चर्यकारक निर्णय लागल्याने सर्वांना मोठा धक्का बसलाय. सुपरस्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या (Messi) अर्जेंटिना संघाला पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्ड कपमधील लिंबू टिंबू मानल्या जाणाऱ्या साऊदी अरेबियाने अर्जेंटिनाचा 1-2 ने पराभव (Saudi Arabia defeated Argentina) केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

FIFA World Cup 2022 मधील तिसरा सामन्यात मोठा उलटफेर पहायला मिळाला. दहाव्या मिनिटाला लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली आहे. मात्र, त्यानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंना आक्रमक खेळ दाखवता आला नाही.



सालेह अलशेहरीने (Saleh Alshehri) 48 व्या मिनिटाला गोल करत अर्जेंटिनासोबत बरोबरी साधली. त्यानंतर लगेचच 5 मिनिटाने सालेम अल्दवसरीने 53 व्या मिनिटाला (Salem Aldawsari) गोल केला आणि साऊदी अरेबियाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मेस्सी अँड कंपनी टेन्शनमध्ये आले. अर्जेटिंनाने (Argentina) आक्रमक खेळ करण्याचा पर्यत्न केला.


आणखी वाचा - FIFA WC 2022 : राष्ट्रगीतावेळी इराणी खेळाडूंची 'ती' कृती चर्चेत; सरकारच्या 'या' गोष्टीला दर्शवला विरोध


दरम्यान, अखेरच्या 10 मिनिटात अर्जेंटिनाकडे दोन फ्री किकची (free kick) संधी चालून आली. मात्र, दोन्ही वेळेस मेस्सीला (Messi) गोल करता आला नाही आणि अखेरीस बलाढ्या अर्जेंटिनाचा पराभव करत साऊदी अरेबियाने (Saudi Arabia defeated Argentina) पहिला विजय नोंदवला आहे. अर्जेंटिनाच्या पराभवानंतर अनेकांना मोठा धक्का बसलाय. तर मेस्सीच्या चाहते देखील दुखात आहेत.