Saurabh Walkar Performance Analyst : सर्वांना उत्सुकता लागलेल्या आगामी वर्ल्ड कप (ICC World Cup 2023) यावर्षी भारतात खेळवला जाणार आहे. भारत यंदा होस्ट असल्याने टीम इंडियासाठी हा वर्ल्ड कप महत्त्वाचा ठरणार आहे. येत्या 5 ऑगस्टपासून भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळवले जातील. त्याआधी आता टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. रोहित आणि सूर्यकुमार यादवच्या एका जोडीदाराने भारताची साथ सोडली. तो आता थेट न्यूझीलंडच्या (New Zealand) खेम्यात सामील झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परफॉर्मन्स अ‍ॅनलिस्ट सौरभ वालकरला (Saurabh Walkar) न्यूझीलंडने वनडे वर्ल्डकप 2023 साठी करारबद्ध केलं आहे. त्यामुळे आता तो येत्या काळात न्यूझीलंडसोबत जोडला जाणार आहे. येत्या 30 तारखेपासून सौरभ वालकरचा न्यूझीलंडसोबतचा पहिला दौऱ्यावर जाईल. इंग्लंडविरूद्ध न्यूझीलंड संघ दोन हात करणार आहे. टी-ट्वेंटी मालिकेत  सौरभ वालकर न्यूझीलंडसोबत जोडला जाईल. आगामी वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडच्या फिरकीपटू्ंवर काम करण्यासाठी टॉम लॅथमच्या नेतृत्वात सौरभ वालकरला बोलवण्यात आलंय. संघाला फिरकी खेळपट्टीसाठी तयार करण्याची जबाबदारी सौरभ वालकरवर असणार आहे.


काय म्हणाला सौरव वालकर?


भारतातील खेळपट्ट्या या विशेष असतात. या पीचची भूमिका देखील विशेष असते. तुम्ही नियोजन करत असताना पीचचा विचार करणं महत्त्वाचं असतं. सर्वजण सध्या भारताविरुद्ध रणनिती तयार करत आहे. न्यूझीलंड संघाला देखील माझ्याकडून अशाच अपेक्षा असतील. माझ्यासाठी खासकरून हा वर्ल्ड कप आणि न्यूझीलंड संघाचा भाग होणं ही एक मोठी संधी आहे, असं सौरव वालकर मिड डेशी बोलताना म्हणाला आहे.


मी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर यांच्यासोबत काम केलंय. त्यामुळे मी आता स्वत:ला तयार करण्याचं काम करतोय. न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टेड यांना सहाय्य करण्यासाठी आम्ही संघ म्हणून तयार आहोत, असंही वालकर म्हणतो. परफॉर्मन्स अ‍ॅनलिस्ट म्हणून सौरव वालकर याची ओळख आहे. वालकरने मुंबई संघासोबत 8 वर्षे काम केलंय. याआधी त्याने राजस्थान रॉयल्स आणि अफगाणिस्तान संघासाठी देखील काम केलंय.


आणखी वाचा - शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी; 'या' 2 टीम खेळणार World Cup 2023 ची फायनल!


दरम्यान, अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना रंगणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होणार आहे.  भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी होईल. तर 23 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यात धर्मशाला येथे सामना खेळवला जाईल.