शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी; 'या' 2 टीम खेळणार World Cup 2023 ची फायनल!

Shoaib Akhtar On World Cup 2023: आगामी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात होणार आहे, असं मत शोएब अख्तर याने नोंदवलं आहे.

Updated: Jun 5, 2023, 12:46 AM IST
शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी; 'या' 2 टीम खेळणार World Cup 2023 ची फायनल! title=
Shoaib Akhtar, World Cup 2023

ICC World Cup 2023: यंदाच्या वर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप (World Cup 2023) खेळवला जाणार आहे. आयसीसीकडून (ICC) आयोजित केल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्ड कपचं (ODI WC 2023) यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलंय. त्यामुळे भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळख असलेल्या शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने मोठी भविष्यवाणी केली आहे. 

काय म्हणाला शोएब अख्तर?

आगामी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्यात होणार आहे, असं मत शोएब अख्तर (Shoaib Akhtar On World Cup 2023) याने नोंदवलं आहे. काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरने एक वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, 2011 च्या वनडे वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता, आता वर्ल्ड कपमध्ये भारताला हरवून 2011 चा बदला पाकिस्तानला घ्यायचा आहे. मात्र, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येतात की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

कोणत्या शहरांचा समावेश?

18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे. भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार असून यामध्ये हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदूर, दिल्ली, लखनऊ, चेन्नई, बंगळूरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) यांच्यात आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिचा (ICC World Test Championship) फायनल सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर आशिया कपची स्पर्धा खेळवली जाईल. त्यानंतर भारतात वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. वनडे वर्ल्डकप क्रिकेट जगातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. त्यामुळे आता 2011 चा पराक्रम पुन्हा एकदा टीम इंडिया करून दाखवणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

आणखी वाचा - World Cup 2023 साठी अचानक टीमची घोषणा; 'या' खेळाडूंना मिळाली संधी!

दरम्यान, भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांनीही 2023 च्या वर्ल्ड कपसाठी पात्रता मिळवली आहे. मात्र, इतर संघांना क्वालिफायर सामने खेळावे लागतील.