मुंबई : भारतीय टीमच्या यादीत आता पुन्हा एकदा तेंडुलकर नाव समाविष्ट होणार आहे. कारण सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन आगामी श्रीलंकेच्या विरुद्ध 4 दिवसीय 2 सामन्यांमध्ये अंडर-19 टीममध्ये खेळणार आहे. 18 वर्षीय अर्जुन हा फास्ट बॉलर आहे आणि मध्यक्रमात तो बॅटींग करतो. त्याची उंची 6 फूट आहे. बंगळुरुमध्ये भारत अंडर-19 टीमची घोषणा झाली. अर्जुन तेंडुलकरने भारताचे माजी फास्ट बॉलर सुब्रतो बनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली बॉलिंगचे धडे घेतले आहे. बीसीसीआयच्या धर्मशाला येथील फास्ट बॉलरच्या शिबिरात देखील तो सहभागी झाला होता.


गांगुलीची प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा सौरव गांगुलीला अर्जुन तेंडुलकरच्या अंडर-19 टीममध्ये निवडीबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने त्याला शुभेच्छा दिल्या. गांगुलीने म्हटलं की, त्याने अजून अर्जुनला खेळतांना पाहिलं नाही. पण मला आशा आहे की तो चांगली कामगिरी करेल.


सचिनची प्रतिक्रिया


सचिन तेंडुलकरने देखील प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'अर्जुनची भारताच्या अंडर-19 टीममध्ये निवड झाल्याने आम्ही आनंदीत आहोत. त्याच्या क्रिकेट करिअरसाठी ही महत्त्वाची संधी आहे. अंजली आणि मी नेहमी अर्जुनला आवडीला समर्थन करु आणि त्याच्या यशासाठी प्रार्थना करु.'