भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टेस्ट: भारतीय बॉर्लसचा आफ्रिकेला दणका
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने आफ्रिकेला चांगलाच दणका दिला आहे.
केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने आफ्रिकेला चांगलाच दणका दिला आहे.
पहिल्या टेस्ट मॅचला शुक्रवारी सुरुवात झाली असून मॅचच्या सुरुवातीला आफ्रिकन टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मैदानात आलेल्या आफ्रिकन टीमला भारतीय बॉलर्सने दणका दिला आणि २८६ रन्सवर ऑल आऊट केलं.
टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक म्हणजेच ४ विकेट्स घेतले. भुवनेश्वर कुमारने केलेल्या बॉलिंगमुळे आफ्रिकेच्या बॅट्समनला चांगलाच चकवा दिला.
भुवनेश्वर कुमारने डीन एल्गर याला खातंही उघडून दिलं नाही. भुवीने दुसऱ्या ओव्हरमध्ये मार्कराम आणि पाचव्या ओव्हरमध्ये अमलाला ३ रन्सवर आऊट केलं.
टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने ४ विकेट्स, आर अश्विनने २ विकेट्स आणि मोहम्मद शमी, बुमराह, हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतले.
दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडून एबी डेविलियर्सने ६५ रन्स, प्लेसिसने ६२ रन्स आणि क्यु डी कॉकने ४३ रन्स केले. या तिघांव्यतिरिक्त इतर बॅट्समनला मोठा स्कोर उभारण्यात अपयश आलं.