Video: आयपीएलचे दोन दमदार खेळाडू मैदानात भिडले, उपांत्यपूर्व सामन्यात प्रचंड गोंधळ
Sayed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळाडू आपली ताकद दाखवताना दिसले. बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान आयपीएलचे दोन दमदार खेळाडू एकमेकांशी भिडल्याने प्रचंड गोंधळ उडाला.
Nitish Rana vs Ayush Badoni : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळाडू आपली ताकद दाखवताना दिसले. या स्पर्धेसाठी उपांत्य फेरीतील सेमीफाइनलिस्टही निश्चित झाले आहेत. दरम्यान, बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान आयपीएलचे दोन दमदार खेळाडू एकमेकांशी भिडल्याने प्रचंड गोंधळ उडाला. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका बाजूला युवा खेळाडू आयुष बडोनी आणि दुसऱ्या बाजूला KKRचा स्टार खेळाडू नितीश राणा होता.
नक्की काय झालं?
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत दिल्ली आणि यूपी यांच्यात सामना झाला. दिल्लीचा कर्णधार असलेले आयुष बडोनी आणि दुसरीकडे नितीश राणा आमनेसामने आल्याने सामन्याने रोमांचक वळण घेतले होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नितीश राणा गोलंदाजी करताना दिसत आहेत. त्याने चेंडू टाकल्यावर आयुष त्या चेंडूवर शॉट मारून रन काढण्यासाठी दाखवला. त्यावेळेची धावत आलेल्या आयुष बडोनीसमोर नितीश राणाने येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली.
हे ही वाचा: पाकिस्तान ऐकायला तयार नाही, चॅम्पियन्स ट्रॉफीवर सुरू झालं नवीन 'नाटक'! ICC समोर ठेवली 'ही' अट
अंपायरने हस्तक्षेप केला का?
या दोघांची बाचाबाची एवढी झाली की शेवटी काही वेळाने अंपायरला मदतीला यावे लागले. आयुष बडोनीवर नितीश राणा खूपच भडकलेला दिसत होता. नितीश राणा याआधीही अनेकदा खेळाडूंसोबत भांडताना दिसला आहेत. या सामन्यात नितीश राणाच्या संघाचा पराभव झाला तर, दिल्लीला उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले.
हे ही वाचा: CT 2025: टीम इंडिया 'या' सामन्यासाठी जाणार पाकिस्तानला, वेळापत्रकातून मिळाला इशारा; माजी क्रिकेटरचा दावा
बघा व्हायरल व्हिडीओ
हे ही वाचा: Rishabh Pant: "खूप फोन कॉल्स, मेसेज झाले..." ऋषभ पंतबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
राणाने केकेआर सोडला
IPL 2025 मेगा लिलावापूर्वी KKR ने नितीश राणाला रिलीज केले होते. मात्र, लिलावात राजस्थान संघाने राणामध्ये रस दाखवला आणि त्याला ४.२० कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले. त्याच वेळी, आयुष बडोनी लखनऊ सुपर जायंट्सचा एक भाग होता, ज्याला संघाने आधीच 4 कोटी रुपये देऊन आधीच रिटेन ठेवले होते.