मुंबई : पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल -2021 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण-आफ्रिकेच्या (South Africa) मार्को जानसेनला (Marco Jansen) अंतिम 11 खेळाडूंमध्ये जागा दिली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चांगली कामगिरी करुन बॅालरनेही सगळ्यांना प्रभावित केले. तरीही सामन्यात मुंबईला दोन गडी राखून पराभव पत्करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जानसेनची आकडेवारी चांगली होती. त्याने चार ओव्हरमध्ये 28 धावा दिल्या आणि दोन विकेट्स त्याच्या नावावर केले. या दोन विकेट्समध्ये ग्लेन मॅक्सवेल सारख्या बॅट्समॅनचा विकेटदेखील त्याने घेतला होता. मार्को जानसेनच्या बॅालिंगने न्यूझीलंडचा माजी खेळाडू स्कॉट स्टायरिससह (Scott Styris) सर्वांनाच प्रभावित केले, परंतु स्टायरिसने मार्को जानसेनची निवड करणे ही, मुंबईची चूक असल्याचे म्हंटले आहे.


स्टायरिसने मार्को जानसेनचे कौतुक केले आणि सांगितले की, हा खेळाडू आयपीएलमध्ये येणाऱ्या काळात चमत्कार करेल. स्टार स्पोर्ट्स शोमध्ये स्टायरिस म्हणाले की, "मला वाटते की, ही एक चांगली कामगिरी होती. तो त्याचा प्रभाव पाडण्यात सक्षम झाला. याचे कारण इतकेच नाही की, तो उंच आहे म्हणून त्याला बाऊन्स मिळतो तर तो 143 च्या वेगाने बॅाल फेकतो जे अप्रतिम आहे. ज्यांच्याकडे वेग असेल त्यांचा बॅालला बाऊन्स मिळेल.


यावेळी खेळण्याचा चुकीचा निर्णय


स्टायरिसने मार्को जानसेनचे कौतुक केले आणि तो म्हणाला की, "आयपीएल -2021 मध्ये मार्को जानसेनला खेळवणे हा मुंबई इंडियन्सचा चुकीचा निर्णय होता कारण तो आता चर्चेचा विषय झाला आहे आणि पुढच्या वर्षीच्या लिलावात मुंबईला त्याला प्रचंड पैसे द्यावे लागणार आहे. जसे आपण आता त्याच्याबद्दल बोलत आहोत, तसेच प्रत्येकजण त्यांच्याबद्दल बोलत आहे. पुढच्या वर्षी मोठा लीलाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मला वाटते की जानसेनला आपल्याकडे ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सना मोठा पैसा द्यावा लागू शकेल."



ते म्हणाले, “म्हणून मी सल्ला देतो की लोकांनी लांबचा विचार केला पाहिजे. जानसेन यावर्षी चांगली कामगिरी करेल अशी शक्यता आहे, जेणेकरुन मुंबई मध्ये तो दुसऱ्या खेळाडूची जागा घेईल आणि जानसेनला बराच काळ टीममध्ये ठेवता येईल. कारण मला वाटते की, या बॅालरमध्ये अशी क्षमता आहे की, तो पुढच्या दहा वर्षांत आयपीएलमध्ये फ्रंट लाइन वेगवान गोलंदाजांप्रमाणे खेळू शकेल."