PSL 2023: कंगाल पाकिस्तानात चोरांचा सुळसुळाट; स्टेडियममधून चोरांनी पळवले थेट CCTV कॅमेरे!
पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात प्रेक्षकांनी स्टेडियममधील सामान चोरी करून घरी नेल्याची घटना घडली आहे. नुकतीच अशी घटना घडली आहे.
Security cameras stolen from Gaddafi stadium : पाकिस्तानात (Pakistan) कधी काय होईल याचा नेम नाही. पाकिस्तान सुपर लीग 2023 (Pakistan Super League) मध्ये आतापर्यंत एकूण 13 सामने खेळवण्यात आले आहेत. ही स्पर्धा आता रोमांचक टप्प्यावर आली आहे. मात्र आता या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय. एकीकडे मुल्तान, रावलपिंडी आणि लाहोरऐवजी सर्व सामने कराचीत घेण्याची मागणी केली जातेय. अशातच आता एक नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
प्रेक्षक स्टेडियममधील सामान करतायत चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात प्रेक्षकांनी स्टेडियममधील सामान चोरी करून घरी नेल्याची घटना घडली आहे. नुकतीच अशी घटना घडली आहे. ज्या ठिकाणी स्टेडियममधील 8 सीसीटीव्ह कॅमेरे चोरी (Security cameras stolen from Gaddafi stadium) करण्यात आले आहेत. याशिवाय फायबर केबल आणि काही बॅटरींची चोरी झाली आहे.
पाकिस्तानचं लाखो रूपयांचं नुकसान
गद्दाफी स्टेडियममध्ये असलेले एकूण 10 लाखांहून अधिक किमतीचं सामान चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. याप्रकरणी गुलबर्ग पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.
सोशल मीडियावर पाकिस्तान ट्रोल
या चोरीच्या घटनेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा पाकिस्तानची खिल्ली उडवण्यात येतेय. यावेळी चाहते पाकिस्तानला आशिया कप 2023 वरून ट्रोल करतायत. तर काहींनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मजेशीर मीम्स तयार केले आहेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पंजाब सरकारमध्ये सुरक्षेच्या खर्चावरून आलबेल नसल्याची माहिती आहे. यामुळे लाहोर तसंच रावळपिंडीमध्ये होणार्या सामन्यांवरून वादाला सुरुवात झाली आहे. दरम्यान याबाबत पंजाब सरकारने सुरक्षा निधीची मागणी 450 दशलक्ष रुपयांवरून 250 दशलक्ष रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डानुसार, पंजाब सरकारने बोर्डाला ही रक्कम देण्यास सांगितलं शिवाय लाहोर तसंच रावळपिंडीचे सामने कराचीला हलवले जातील. पीएसएलचा हा 8वा सिझन खेळला जातोय.