मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना तिरुवनंतपूरम येथे खेळला जाणार आहे. त्याआधी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडने 40 धावांनी पराभव केला होता. धोनीने सामन्यात 49 रन केले पण त्यासाठी त्याने 37 चेंडू खेळले. यानंतर त्याच्या फलंदाजीबद्दल प्रश्न निर्माण केले जात होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी भारताचा माजी धडाकेबाज क्रिकेटर विरेंद्र सेहवागने धोनीला एक सल्ला दिला आहे. पहिल्या बॉलपासून धोनीने गोलंदाजांना धुणे सुरु केले पाहिजे. सेहवागने म्हटलं की, 'धोनीने टीममध्ये आपली भूमिका ओळखली पाहिजे. मोठ्या स्कोरचा पाठलाग करतांना त्याला लवकर रन बनवावे लागतील. निवड समितीने त्याला याबाबत सांगितलं पाहिजे.'


सेहवागने हे देखील म्हटलं की, 'विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला धोनीची आवश्यकता आहे. टी-20 मध्ये देखील धोनीची आवश्यकता आहे. तो योग्य वेळ आली की निवृत्त होईल. तो कोणत्याही युवा खेळाडुचा रस्ता नाही रोखणार.'