मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यंदाच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळेल. मागच्या मोसमापासून सेहवाग पंजाबचा सल्लागार म्हणून काम करत आहे. ८ एप्रिलला सेहवाग दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये मैदानात उतरेल, असं ट्विट किंग्ज इलेव्हन पंजाबनं केलं होतं. ब्रेकिंग न्यूज तुम्हाला पुन्हा एकदा शानदार बॅटिंग बघण्याची संधी मिळणार आहे. सेहवाग पुन्हा मैदानात उतरेल आणि ऍरोन फिंचऐवजी तो टीममध्ये असेलं, असं या ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


पंजाबच्या वेबसाईटवरही माहिती


सेहवाग कमबॅक करत आहे आणि तो फिंचऐवजी पंजाबकडून ओपनिंगला उतरेल. हा निर्णय कॅप्टन रवीचंद्रन अश्विन, प्रशिक्षक ब्रॅड हॉज आणि सेहवागमध्ये झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला, अशी माहिती किंग्ज इलेव्हन पंजाबच्या वेबसाईटवर देण्यात आली होती.


तरुण बॉलरना सराव देण्यासाठी मी सुरुवातीला बॅट उचलली होती. पण माझ्या बॅटला बॉल चांगला लागत होता. फिंचऐवजी ओपनिंगला कोण खेळणार हा प्रश्न आमच्यासमोर होता, तेव्हा ब्रॅडनं मस्करीमध्ये माझं नाव घेतलं आणि मग मी याबाबत विचार करायला लागलो, असं सेहवाग या वेबसाईटवर म्हणाला होता.


सेहवागनं केला खुलासा


१ एप्रिलला दिवसभर ही बातमी व्हायरल होत होती शेवटी सेहवागनं रात्री याबद्दल खुलासा केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून सेहवागनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबनं सगळ्यांना एप्रिल फूल बनवलं असल्याचं सेहवागनं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.



अशी आहे किंग्ज इलेव्हन पंजाबची टीम


युवराज सिंग, क्रिस गेल, एरॉन फिंच, अक्षर पटेल, के.एल.राहुल, अॅण्ड्रू टाय, डेव्हिड मिलर, मार्कस स्टॉयनीस, करुण नायर, मयंक अग्रवाल, मनोज तिवारी, अक्षदीप नाथ, आर.अश्विन, मोहित शर्मा, बरिंदर सरान, मुजीब जदरण, बेन ड्युवौर्शुईस, अंकित राजपूत, मयंक डागर, प्रदीप साहू, मंजूर अहमद डार