मुंबई : क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आज जगात कोठेही गेला तरी त्याचे लोखा चाहते आहेत. माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने मास्टर ब्लास्टरला राम म्हटलं आहे आणि स्वत: हनुमान असल्याचं म्हटलं आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आणि सचिन तेंडुलकर एकत्र दिसत आहे. सहवागने फोटो शेअर करत म्हटलं की, जेव्हा तुम्ही देवाच्या सोबत असता तेव्हा त्यांच्या चरणाजवळ असणं चांगलं वाटतं. या फोटोमध्ये सचिनला देखील त्याने टॅग केलं आहे. सोबतच त्याने हॅशटॅग वापरत लिहिलं आहे की, हॅमर नाही गदा आहे आणि राम जी, हनुमान जी.



हा फोटो एका कार्यक्रमातील आहे. सेहवाग गदा घेऊन गुडघ्यावर बसला आहे. तर सचिनच्या हातात कप आहे. क्रिकेटमध्ये सचिन आणि सेहवागने भारताला खूप काही दिलं आहे. सचिन आणि सेहवागने 93 वनडेमध्ये भारतासाठी ओपनिंग केली आहे.