नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने त्याच्या काळात चांगल्या चांगल्या बॉलर्सला आपल्या फटक्यांनी गार केले. त्याची आक्रमक खेळी आजही अनेकांच्या स्मरणातून जावू शकत नाही. तो जेव्हा मैदानात उतरायचा तेव्हा त्याची दहशत ती गोलंदाजांमध्ये दिसायची. फॉरमॅट कोणताही असो सेहवाग हा त्याच्या फटकेबाजीनेच सुरुवात करायचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेहवागनंतर आता चर्चा आहे त्याच्या भाच्याची. रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या भाच्याने आपल्या कामगिरीने सर्वांचं मन जिंकलं आहे. सेहवाग (Virender Sehwag) त्याच्या बॅटींगने मैदान गाजवायचा. त्याचा भाचा आता गोलंदाजीने मैदान गाजवत आहेत.


वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) च्या चुलत बहिणीचा मुलगा मयंक डागर (Mayank Dagar) हिमाचल प्रदेश संघाकडून रणजी ट्रॉफी खेळतो. तो भारतीय संघाचा अंडर-19 वर्ल्ड कप टीमचा देखील भाग होता. मयंक एक घातक लेफ्ट आर्म स्पिनर सोबतच चांगली फलंदाजी देखील करतो.


रणजी ट्रॉफीमध्ये त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश या संघात झालेल्या सामन्यात मयंक डागरने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच धक्का दिला. त्रिपुराच्या फलंदाजांना त्याने जास्त वेळ टिकूच दिले नाही. मयंकने त्रिपुराच्या विरुद्ध 9 विकेट घेतले. हिमाचल प्रदेशच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली.


मयंक डागरने पहिल्या इनिंगमध्ये 21.2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 4 मेडन ओव्हर टाकले. त्याने 55 रन देत 5 विकेट घेतले. ज्यामध्ये टॉप ऑर्डरच्या 3 फलंदाजांचा देखील समावेश आहे.


दुसरी इनिंगमध्ये मयंकने हीच कामगिरी कायम ठेवली. त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये 13.4 ओव्हरमध्ये 30 रन देत 4 विकेट घेतले. मयंकने दोन्ही इनिंगमध्ये 85 रन देत 9 विकेट घेतले.


हिमाचल प्रदेशने आधी फलंदाजी करताना 365 रन केले. पहिल्या इनिंगमध्ये त्रिपुरा संघाने 202 रन करत ऑलआऊट झाली. त्यानंतर त्रिपुराने फॉलोऑन खेळला. पण दुसऱ्या इनिंगमध्ये 133 रनवर संपूर्ण टीम ऑलआऊट झाली. हिमाचल प्रदेशचा संघ 1 इनिंग आणि 30 रनने विजयी झाला. हिमाचल संघाचा कर्णधार अंकित कलशीने 147 रनची शानदार खेळी केली. तर राघव धवनने 68 रन केले.