IND vs SL: `किसीने मुफ्त में पा लिया वो शख्स...`, टीम इंडियातून डावलल्याने Prithvi shaw ची इमोशनल पोस्ट!
IND vs SL Selectors Ignored Prithvi Shaw: देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic cricket) त्याने चांगली कामगिरी केल्यावर त्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षा भंग झाल्याने पृथ्वी शॉ नाराज असल्याचं दिसतंय.
Prithvi shaw Emotional Post: एक काळ असा होता... जेव्हा भारताचा युवा, स्फोटक सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi shaw) याला पुढचा सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) अशी उपमा दिली जात होती. मात्र, याच पृथ्वीला सध्या टीम इंडियामध्ये (Team India) संधी मिळणं देखील अवघड झालं आहे. पृथ्वी शॉ 2021 पासून भारतीय संघाबाहेर आहे आणि जवळपास दीड वर्षानंतरही तो टीम इंडियात पुनरागमन करू शकलेला नाही. अशातच आता नुकत्याच जाहीर झालेल्या श्रीलंका विरुद्ध (IND vs SL) देखील त्याला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता क्रिडाविश्वास नाराजीचं वातावरण असल्याचं पहायला मिळतंय. (selectors ignored prithvi shaw broke down removed insta dp after emotional post IND vs SL marathi news)
पृथ्वीला यंगिस्तानच्या टी-ट्वेंटी स्कॉडमध्ये संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, सिलेक्टर्सने पृथ्वीवर विश्वास (Selectors ignored prithvi shaw) दाखवला नाही. मागील काळ खराब फॉरमधून जात असलेल्या पृथ्वीने जोरदार कमबॅक केलं होतं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic cricket) त्याने चांगली कामगिरी केल्यावर त्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षा भंग झाल्याने पृथ्वी शॉ नाराज असल्याचं दिसतंय.
आणखी वाचा - Inside story : जडेजा, बुमराह दोन्ही हुकमी एक्क्यांना BCCIने दाखवून दिली जागा?
टीम इंडियाची घोषणा (Team India Squad Announced) झाल्यानंतर पृथ्वी शॉ याने त्याच्या इन्टाग्रामवर (Prithvi shaw Instragram) एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये त्याने शायरी देखील लिहिली होती. पृथ्वीच्या या स्टोरीवरून अनेक वेगळवेगळे अर्थ काढले जात आहेत. तसेच पृथ्वीने त्याचा इन्टाग्राम अकाऊंटचा डीपी (Instragram DP) देखील हटवला आहे.
पाहा पोस्ट -
दरम्यान, इन्टाग्राम स्टोरीवर पृथ्वीने एक रिल शेअर केला होता. उझैर हिजाजी यांची (Uzair Hijazi) शायरी पृथ्वीने शेअर केली. 'किसीने मुफ्त में पा लिया वो शख्स... जो मुझे हर कीमत पर चाहिते था', असं या स्टोरीमध्ये म्हटलं गेलंय. त्यावर कमेंट करताना शॉने 'क्या बात...', असं म्हणलंय. त्याची ही पोस्ट पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पृथ्वी शॉला नेमकं काय म्हणायचंय?, असा सवाल क्रिडाविश्वात उपस्थित केला जातोय.