अंडर-१९ टीमच्या खेळाडूंवर सिनिअर खेळाडूंच्या शुभेच्छांचा वर्षाव
अंडर-१९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली आहे.
नवी दिल्ली : अंडर-१९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वातील टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली आहे.
‘द वॉल’ राहुल द्रविड याच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या टीमला दमदार मात दिली. त्यांच्या या दमदार खेळीसाठी दिग्गजांकडून शुभेच्छा दिल्या आहेत. आता टीम इंडियाचा सामना फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.
‘क्रिकेटचा देव’ म्हटल्या जाणा-या सचिन तेंडुलकरने ट्विट करुन अंडर-१९ क्रिकेट टीमला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अर सुरेश रैना यानेही टीम इंडियातील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. ‘मैलाच्या दगड केवळ एक पाऊल पुढे आहे. वर्ल्डकप फायनल खेळण्याची संधी रोज मिळत नाही. त्यामुळे ही संधी सोडू नका’ असे तो म्हणाला.
वीरेंद्र सेहवाग यानेही ट्विट करुन टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. फायनलसाठी शुभेच्छा दिल्यात.
दरम्यान, अंडर-१९ टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड याचंही ट्विटरवरून कौतुक केलं जात आहे. त्याचे फोटो शेअर करून त्याच्याबद्दल भरभरून बोललं जात आहे.
आता अंडर-१९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना शनिवारी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. टीम इंडिया इथेही बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.