नवी दिल्ली : गौतम गंभीर म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील सर्वात भरवशाचा फलंदाज. गौतमही चाहते आणि संघाची अपेक्षापूर्ती करत मैदानावर गंभीर खेळी करतो. त्यामुळे त्याची खेळी लक्षवेधी नाही झाली तरच नवल. त्याच्या एकूण खेळीवर लक्ष टाकल्यावर हे अधिक ठळकपणे लक्षात येते. गौतमने अवघ्या १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशकतकं केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर इतकी दमदार कामगिरी करणारा हा खेळाडू गेले अनेक दिवस संघापासून दूर आहे. गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०१६च्या नोव्हेंबरमध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तेव्हापासूनत तो टीम इंडियात संधी मिळण्याची प्रतिक्षा करतो आहे. अर्थात त्याच्या पुनरागमनाची चर्चा आहे. पण, ती जितक्या लवकर प्रत्यक्षात येईल तितके चांगले. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्येही गौतम गंभीर आणि त्याचा संघ कोलकाता नाईटराईडर्सने सातत्याने दमदार कामगिरी केली. पण, त्याच्या चाहत्यांना अलिकडे वाटू लागले आहे की, टीम इंडियातील त्याचा प्रवेश आता अनिश्चित आहे.


१४ ऑक्टोबर १९८१मध्ये जन्मलेला गौतम आपल्या खेळाप्रमाणेच समाजकार्यातही गंभीर असतो. नुकतीच त्याने जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानाच्या मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्विकारणार असल्याचे सांगितले. त्याच्या या विचाराचे सर्व स्तरातून चांगले कौतूक झाले. गौतम सध्या जरी संघाबाहेर आहे. पण, एक काळ होता गौतमशिवाय भारतीय संघाचा विचारही कठीण होता. कारण, त्याची मैदानावरील कामगिरी. २००३मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरची सुरूवात करणाऱ्या गौतमने आतापर्यंत सर्व प्रकारातील एकूण २४२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १०३२४ धावा बनवल्या आहेत.


गौतमने जुलै २००८ ते जानेवारी २०१० या कालावधीत क्रिकेटच्या तीनही प्रकारात (टेस्ट, वनडे, टी-20) खेळत एकूण ७८ सामन्यांत ३३८४ धावा केल्या. या १८ महिन्यांच्या कालावधीत गौतमने ९ शतकं आणि १९ अर्धशतकं ठोकली. यात एक द्विशतकाचाही समावेश आहे. जे त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकवले होते. त्याने आतापर्यंत दोन वर्ल्डकप खेळतले आहेत. त्यापैकी दन्ही वर्ल्डकपमध्ये त्याची कामगिरी दमदार राहिली आहे.