सायना नेहवाल इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत
२०१८ बॅडमिंटन हंगामाची सुरुवात सायना नेहवालनं दिमाखात केलीय. सायनानं इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. उपांत्य फेरीत सायनानं थायलंडच्या राचनोक इंतनॉनवर मात केली.
नवी दिल्ली : २०१८ बॅडमिंटन हंगामाची सुरुवात सायना नेहवालनं दिमाखात केलीय. सायनानं इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. उपांत्य फेरीत सायनानं थायलंडच्या राचनोक इंतनॉनवर मात केली.
सायनानं आपली लढत २१-१९, २१-१९ नं जिंकली. चौथ्या मानांकित राचनोकनं कडवा प्रतिकार केला खरा मात्र, सायनाच्या धडाक्यासमोर तिचं काहीच चाललं नाही. सायनानं अवघ्या ४९ मिनिटात राचनोकचा धुव्वा उडवला.
आता अंतिम सामनाही जिंकत सायनानं २०१८ हंगामातील पहिलं विजेतेपद पटकवावं अशी तिच्या चाहत्यांना आशा असणार आहे.