नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकल्यानंतर पाकिस्तानला शुभेच्छा देणारा फुटीरतावादी नेता मिरवाईज उमर फारूकवर गौतम गंभीरनं निशाणा साधला आहे. मिरवाईज तु सीमेपलीकडे का जात नाहीस, असा सवाल गंभीरनं विचारला आहे. 
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला १८० रन्सनं हरवलं आणि पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला. पाकिस्तानच्या ३३८ रन्सचा पाठलाग करताना भारताचा फक्त १५८ रन्सवर ऑल आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या या विजयावर मिरवाईजनं वादग्रस्त ट्विट केलं. चारही बाजूंनी फटाके वाजवले जात आहेत. असं वाटतंय ईद लवकर आली आहे. आज चांगल्या टीमचा दिवस होता. पाकिस्तानी टीमला शुभेच्छा असं ट्विट मिरवाईजनं केलं.



मिरवाईजच्या या ट्विटला गौतम गंभीरनं प्रत्युत्तर दिलं. मिरवाईज तु सीमेपलीकडे का जात नाहीस? तुला तिकडे चांगले (चीनी) फटाके मिळतील. ईदही तिकडेच साजरी कर. मी बॅग भरायला तुला मदत करू शकतो, असं गंभीर म्हणाला आहे.