COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अमेरिकेची दिग्गज टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सनं शानदार कमबॅक केलंय. दुसऱ्या ग्रॅन्ड स्लॅम फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या दौऱ्यात तिनं जागा मिळवलीय. या टुर्नामेंटमध्ये सेरेनाला काळ्या रंगाच्या सूटमध्ये खेळताना पाहिलं गेलं. या ब्लॅक कॅट सूटमध्ये खेळताना आपल्याला सुपरहिरोसारखं वाटलं, असं तिनं म्हटलंय. या ब्लॅक कॅट सूटच्या मागे तब्येतीचं कारण असल्याचं सेरेनानं स्पष्ट केलंय. सेरेनानं चेक गणराज्यच्या क्रिस्टिना प्लिस्कोवा हिचा पराभव करत पुढच्या टप्प्यात प्रवेश केला.


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुलीच्या जन्मानंतर रक्ताच्या गुठळ्यांची समस्या तिला भेडसावत होती. आपल्या शरीरात योग्यरितीनं रक्त प्रसारण व्हावं यासाठी असा सूट परिधान केल्याचं तिनं म्हटलंय. सेरेनाच्या या सूटची बरीच चर्चा सुरु आहे