मुंबई : वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमच्या १५ खेळाडूंची निवड केली गेली. यामध्ये काही खेळाडूंना स्थान देण्यात आले नाही. वर्ल्ड कपसाठी ज्या खेळाडूंची निवड झालेली नाही, त्यातील ७ खेळाडू हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधी होणाऱ्या काऊंटी क्रिकेट स्पर्धा खेळणार आहेत.  या चॅम्पियनशीप स्पर्धेनुसार भारतीय टीमला येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडिज विरुद्ध २ टेस्ट मॅच खेळायच्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ७ खेळाडूंची निवड केली आहे. यामध्ये टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी,  मयांक अग्रवाल, आर आश्विन, आणि इशांत शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेतेश्वर पुजारा 'यॉर्कशायर' या टीमकडून खेळणार आहे. यॉर्कशायर टीमने पुजारला ३ वर्षांसाठी करारबद्ध केले आहे. अंजिक्य रहाणे देखील लवकरात लवकर 'हॅम्पशायर' टीमसोबत करार करणार आहे. पंरतु अंजिक्य रहाणेला क्रिकेट प्रशासकीय समितीच्या (सीओए) वतीने  परवानगी देण्यात आलेली नाही. रहाणे परवानगी मिळण्याची वाट पाहत आहे.  बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 'सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांनी परवानगी दिली आहे. परंतु डायना एडुल्जी आणि लेफ्टनंट जनरल रवि थोडगे यांच्याकडून परवागनी मिळणे बाकी आहे.'   
 
'वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारत वेस्टइंडिज विरुद्ध २ टेस्ट मॅच खेळेल. टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले खेळाडू हे जून-जुलै दरम्यान किमान ४  काऊंटी मॅच खेळणार आहेत. काऊंटी मॅच खेळण्यासाठी ड्यूक बॉ़लचा वापर केला जातो. ड्यूक बॉलने खेळल्याने खेळाडूंचा चांगल्या पद्धतीने सराव होईल'. अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे.


वेस्टइंडिज विरुद्धच्या सीरिजआधी आपले खेळाडू पहिल्या ३-४ प्रथम श्रेणी क्रिेकेट मॅचमध्ये कशाप्रकारची कामगिरी करतात यावर बीसीसीआयचे लक्ष असेल. 'वेस्टइंडिज मध्ये पूर्णपणे परिस्थिती ही वेगळी असणार आहे. भारताचे ७ खेळाडू हे इंग्लिश काउंटी क्रिेकेटमध्ये १ किंवा २ तुकड्यांमध्ये खेळतील'. असा आशावाद बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला. भारताचा कॅप्टन विराट कोहलीला गेल्यावर्षी सरे टीमकडून खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु विराट दुखापतग्रस्त असल्याने त्याला खेळता आले नाही.