मुंबई : येत्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स टीमला नवा गोलंदाज मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्यांदाच मुलांच्या संघात एक मुलगी सहभागी होऊ शकते.. हे वाचायला थोडं विचित्र वाटतय ना ? पण नाईट रायडर्सचा मालक शाहरूख खानची अशी इच्छा आहे. 
 नुकताच गौतम गंभीरने एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये चक्क गौतमची मुलगी त्याला बॉल टाकत आहे. त्यामुळे तिच्या बॉलिंगवर फिदा झालेल्या शाहरूखने तिला नाईट रायडर्समध्ये बॉलिग टाकायला घेऊन ये असा संदेश दिला आहे. 
 




 


 गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू आणि कर्णधार आहे.  गौतमची तीन वर्षांची मुलगी आजीनने त्याला बॉल टाकला होता. शाळेतील हा खास क्षण ट्विटरवर पोस्ट करताना त्यानं लिहलं होतं अजीनच्या बॉलचा सामना करणं हा क्षण दबावपूर्ण होता. तिलाही ठाऊक अअहे माझ्यासाठी ऑफ स्टंप गोलंदाजी करावी लागते. 
 
३६ वर्षीय गौतम  गंभीर हा पूर्वी दिल्ली डेअरडेविल्स संघातून खेळत होता. त्यानंतर तो कोलकत्ता संघाचा भाग झाला. २००१ साली त्याने नताशा जैनशी लग्न केले. १ मे २०१४ ला त्यांच्या आयुष्यात आजीनचा समावेश झाला. गंभीरने आयपीएलमध्ये ३६०० धावा बनवल्या आहेत. एकूण ५८ टेस्ट मॅच, १४७ वनडे आणि ३७ टी २० सामने तो खेळला आहे.