Shahrukh Khan Viral Video : सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामामध्ये गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. सध्या केकेआरचा संघ 10 अंकासह पाईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) दुसऱ्या स्थानी आहे. आठ सामन्यातील 5 विजयासह केकेआरने प्लेऑफच्या दिशेने झेप घेतली आहे. मागील सामन्यात पंजाबविरुद्ध मात्र कोलकाताला पराभवाला सामोरं जावं लागलं. 261 धावा करून देखील पंजाबने धावा चेस केल्या अन् घरच्या मैदानावर केकेआरला पाणी पाजलं. सामना पंजाबने जिंकला खरा पण चर्चा होतीये ती शाहरुख खानच्या लेकाची... अबराम खान (Abram Viral Video) याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (SRK attended KKR vs PBKS match with son AbRam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध केकेआरच्या सामन्यापूर्वी सराव सत्र सुरू होतं. ईडन गार्डन्सवर शाहरूख आणि अबराम सामन्याआधी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी खेळाडूंसह गप्पा मारल्या अन् बॉलने सराव देखील केला. त्यावेळी स्वत: शाहरुखने बॅट हातात घेतली अन् क्रिकेटचा आनंद लुटला. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. मात्र, केकेआरच्या पराभवानंतर शाहरुखला इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात संघात सामील करून घेण्याची मजेशीर मागणी केकेआरच्या चाहत्यांकडून केली जात आहे.



शाहरुखच्या लेकाचा भन्नाट यॉर्कर


शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम हा सराव सत्रादरम्यान रिंकू सिंगसोबत सराव करताना दिसला. तर शाहरुख एका कोपऱ्यात बसून लेकाचं मजा पाहत होता. अबरामने कोलकाताचा स्टार फिनिशर रिंकू सिंगला बॉलिंग केली. मात्र, रिंकूला अबरामला फेस करणं जमलं नाही. रिंकूसमोर अबरामने स्लो गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्याने वाईड यॉर्कर टाकला अन् मोठमोठे सिक्स मारणाऱ्या रिंकूला देखील बॉल खेळता आला नाही. तसं पहायला गेलं तर बॉल वाईड नव्हताच... पण रिंकूला अबरामचा बॉल देखील खेळता आला नाही. त्यामुळे आता सध्या शाहरुखच्या लेकाची चर्चा होताना दिसत आहे.



कोलकाता नाईट रायडर्सचा संघ - फिलिप सॉल्ट (WK), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (C), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरविंद, रहमानउल्ला गुरबाज, मिचेल स्टार्क, अल्लाह गझनफर, साकिब हुसैन, शेरफेन रदरफोर्ड, चेतन साकारिया, नितीश राणा, केएस भरत.