बॉलरला चेंडू मारला, ट्रोलिंगनंतर शाहीन आफ्रिदीने मागितली माफी; व्हिडीयो व्हायरल!
सामना संपल्यानंतर पुन्हा एकदा शाहीनने अफीककडे जाऊन माफी मागितली आहे.
मुंबई : T-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने चांगला खेळ दाखवला, मात्र ऑस्ट्रेलियाने त्यांचं विजेतेपद जिंकण्याचं स्वप्न हिरावलं. वर्ल्डकपनंतर आता पाकिस्तानचा संघ बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे, जिथे तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जातेय. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी रोजी खेळला गेला, ज्यामध्ये पाकिस्तानने बांगलादेश संघाचा विकेटने पराभव केला.
मात्र या सामन्यात एक घटना अशी घडली ज्यामुळे पाकिस्तान टीम आणि त्यांच्या खेळाडूवर पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय. सामन्यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने बांग्लादेशचा फलंदाज अफिफ हुसैन याला चेंडू फेकून मारला. यानंतर तातडीने शाहीन आफ्रिदीने अफिकची माफी मागितली आहे.
दरम्यान सामना संपल्यानंतर पुन्हा एकदा शाहीनने अफीककडे जाऊन माफी मागितली आहे. या गोष्टीचा व्हिडीयो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पाकिस्तानी बॉलर शाहीन शाह आफ्रिदीने बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 मॅचमध्ये केलं. आफ्रिदीला राग आला आणि त्याने रागाच्या भरात बांग्लादेशचा फलंदाज अफिफ हुसेनकडे चेंडू मारला. सामन्यादरम्यान, आफ्रिदीने रागाने बांगलादेशचा फलंदाज अफिफ हुसेनकडे चेंडू मारला. ज्यामुळे तो जमिनीवर पडला आणि त्याला वेदनाही झाल्या. मात्र, फिजिओने प्राथमिक उपचार दिल्याने तो पुन्हा खेळण्यासाठी तयार झाला.
चेंडू स्टंपवर फेकत असल्याचा दावा आफ्रिदी केला होता, पण त्याने चेंडू मुद्दाम मारला हे त्याच्या हावभावावरून स्पष्ट होतंय. कारण शॉट खेळत असताना अफिफ क्रीझच्या आत होता. यावरून शाहीन आफ्रिदीवरही टीका होतेय.