`काश्मीर`वरून आफ्रिदीची मोदींवर टीका, गंभीर म्हणतो `बांगलादेश आठवतं का?`
जगभरात कोरोना व्हायरसचं संकट असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीरचा राग आळवला आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचं संकट असतानाच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीरचा राग आळवला आहे. सोशल मीडियावर आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आफ्रिदी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मिरी जनतेवर अत्याचार करत आहेत, त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. नरेंद्र मोदी धर्माचं राजकारण करत आहेत, अशी टीका आफ्रिदीने या व्हिडिओमध्ये केली आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने शाहिद आफ्रिदीला प्रत्युत्तर दिलं आहे. याआधीही शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्यात अनेकवेळा आरोप-प्रत्यारोप झाले आहेत.
शाहिद आफ्रिदीकडून कराचीच्या हिंदू मंदिरात अन्नधान्य वाटप
'१६ वर्षांचा शाहिद आफ्रिदी म्हणतोय पाकिस्तानच्या ७ लाख फौजेच्या मागे २० कोटी लोकं उभी आहेत. तरीही ७० वर्ष काश्मीरसाठी भीक मागत आहात. आफ्रिदी इमरान खान आणि बाजवा यांच्यासारखे जोकर लोकांना मूर्ख बनवण्यासाठी भारत आणि पंतप्रधान मोदींविरोधात गरळ ओकू शकतात. बांगलादेश आठवतंय का?' असा टोला गंभीरने हाणला आहे.
याआधीही शाहिद आफ्रिदीने काश्मिरी जनतेच्या समर्थनासाठी काश्मीर अवर कार्यक्रम सुरू केला होता. पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंनीही वेळोवेळी काश्मीर प्रश्नावरून भारताविरुद्ध वक्तव्यं केली आहेत.