मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने ''गेम चेंजर' नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. यात त्याने आपल्या क्रिकेट जीवनातील किस्स्यांवर भाष्य केले आहे. यात किस्स्यांपैकी काही किस्से हे वादग्रस्त आहेत. असाच एका किस्स्याचा उलगडा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिदीने आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसऱ्याच मॅचमध्ये जलद शतकी कामगिरी केली होती. त्याने ३७ बॉलमध्ये शतक ठोकले होते. या सोबतच कमी वयात शतक ठोकणारा खेळाडू म्हणून त्याच्या नावावर रेकॉर्डची नोंद झाली होती. आफ्रिदीने हे शतक १९९६ साली श्रीलंकेविरुद्ध लगावले होते.


आफ्रिदीने याबाबत गौप्यस्फोट केला आहे. ज्या बॅटने मी हे शतक लगावले ती बॅट माझी नव्हतीच. ही बॅट सचिन तेंडुलकरची असल्याचे तो म्हणाला. सचिन तेंडुलकरनं आपली बॅट वकार युनूसला पाकिस्तानातील सियालकोट इथल्या दुकानातून नवी बॅट तयार करुन घेण्यासाठी दिली होती. मात्र वकारनं ती बॅट श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी आफ्रिदीला दिली.


आफ्रिदीने केलेल्या या शतकात सचिनचं काही योगदान नसले तरी त्याचे बॅटचे योगदान होते. ही बाब आफ्रिदीच्या आत्मचरित्रामुळे समोर आली आहे. मी जेव्हा हे शतक केले होते, तेव्हा मी १६ वर्षांचा नसून १९ वर्षांचा असल्याची कबूली आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रातून दिली आहे.


आफ्रिदीने श्रीलंकेविरुद्ध खेळताना ४० बॉलमध्ये १०२ रनची खेळी केली होती. त्याने या खेळीत ६ फोर आणि ११ सिक्स लगावले होते. आफ्रिदीच्या या खेळीसोबत वनडेतील सर्वात जलद शतक ठरले होते. तसेच कमी वयात शतक ठोकण्याचा रेकॉर्ड देखील आफ्रिदीच्या नावावर झाला होता.


सर्वाधिक शतक मारण्याचा रेकॉर्ड आफ्रिदीच्या नावावर तब्बल १८ वर्ष होता. १८ वर्षांनंतर न्यूझीलंडच्या कोरी एंड्रसनने आफ्रिदीचा हा रेकॉर्ड मोडीत काढला. त्याने ३६ बॉलमध्ये २०१४ साली वेस्टइंडिज विरुद्ध  ही कामगिरी केली होती.