Pakistan Cricket Board : वनडे वर्ल्ड कपमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) सर्वकाही अलबेल नसल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधाराबाबत पुन्हा एकदा नाट्य सुरूच आहे. पाकिस्तान क्रिकेट टी-ट्वेंटीचा कॅप्टन शाहीन आफ्रिदीला (Shaheen Afridi) कर्णधारपदावरून आणि शान मसूदला कसोटी कर्णधारपदावरून हटवण्याचा विचार करत आहे, अशी माहिती पाकिस्तान मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. बाबरनंतर पाकिस्तानला योग्य कॅप्टन न मिळाल्याने आता पुन्हा बाबर आझमकडे (Babar Azam) कॅप्टन्सी सोपवली जाण्याची शक्यता आहे. अशातच आता जावई शाहीन शाह आफ्रिदीसाठी सासरा शाहिद आफ्रिदी मैदानात उतरला आहे. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धारेवर धरलं अन् खडेबोल सुनावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?


मला वाटतं की तुम्ही एखाद्याला कर्णधार म्हणून नेमलं असेल आणि त्याला जबाबदारी दिली असेल तर त्यालाही वेळ द्यायला हवा. आपल्या क्रिकेटची सर्वात मोठी समस्या ही आहे की, जेव्हा जेव्हा बोर्डावरचे चेहरे बदलतात तेव्हा आपली व्यवस्था बदलते. जो कोणी येतो त्याला वाटते की आपण जे काही करतो ते पाकिस्तान क्रिकेटसाठी सर्वोत्तम आहे. शाहीनला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे, असं स्पष्ट मत शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi On Shaheen Afridi Captaincy) व्यक्त केलं आहे.


जर तुम्ही कर्णधार बदललात तर त्याची नियुक्ती करण्याचा निर्णय एकतर चुकीचा होता किंवा आता बदलण्याचा निर्णय चुकीचा आहे, असंही शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे. आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी शाहीन आफ्रिदीला नारळ दिला जातोय का? असा प्रश्न विचारला जातोय. तर नवा कॅप्टन कोण असेल? पाकिस्तान क्रिकेट पुन्हा बाबरवर विश्वास दाखवणार का? अशी चर्चा देखील पाकिस्तान क्रिकेटमध्ये होताना दिसत आहे.


दरम्यान, याआधी शाहिद आफ्रिदीनं चारचौघात जायवाची इज्जत काढली होती. मी रिझवानच्या मेहनतीची आणि फोकस लेव्हलची प्रशंसा करतो. मला त्याला टी-20 कर्णधार म्हणून पाहायचं आहे, पण चुकून शाहीन कर्णधार झाला, असं शाहिद आफ्रिदीने म्हटलं होतं. कोण काय करतंय आणि काय करत नाही याकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला देखील शाहिद आफ्रिदीने दिला आहे.