मुंबई :  पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने लंका प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. गॅल ग्लॅडिएटर्स संघाचा कर्णधार अफ्रिदी त्याच्या मायदेशी परतला आहे. काही वैयक्तिक इमरजन्सी असल्याचे कारण देत त्याने लीगमधून माघार घेतली आहे. त्यामुळे येत्या सामन्यांमध्ये अफ्रिदीला खेळता येणार नाही. पण सर्व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तो LPLमध्ये परतणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अशी माहिती खुद्द आफ्रिदीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विट करत तो म्हणाला, 'वैयक्तिक कारणामुळे मी घरी जात आहे. पण सगळ काही ठिक झाल्यानंतर मी पुन्हा LPLमध्ये परत येईल.' असं म्हणत त्याने संघाला शुभेच्छा दिल्या. सध्या त्याचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



दरम्यान, लंका प्रीमअर लीगच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आफ्रिदीच्या आपल्या घरी जाण्याचे कारण सांगण्यात आले आहे. आफ्रिदीच्या मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हणून आफ्रिदीने संघातून माघार घेतली आहे.