Stone Pelting on Pakistan Team: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना पाहण्यासाठी आयसीसीच्या (ICC) स्पर्धेची वाट पहावी लागते. गेल्या 15 वर्षांपासून दोन्ही संघात एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. राजकीय तणाव आणि परस्पर संबंध सुधारण्यासाठी क्रिकेटकडे पाहिलं जातं. दोन्ही देशाचे संबंध सुधारावे असं पाकिस्तानच्या खेळाडूंना वाटत नसल्याचं दिसतं. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद अफ्रिदी (Shahid Afridi) याने खळजनक वक्तव्य केलंय.


काय काय म्हणाला शाहिद अफ्रिदी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात खेळणं हा आमच्यासाठी प्रेशरचा क्षण होता. आम्ही सामन्यात फोर आणि सिक्स तर मारत होतो, पण टाळ्या कुणीही वाजवत नव्हतं. अब्दुल रझ्झाकला लक्षात असेल की, बंगळुरू येथील कसोटी सामना आम्ही जिंकल्यावर आमच्या बसवर दगडफेक झाली होती, असं वक्तव्य शाहिद अफ्रिदीने (Shahid Afridi) केलं आहे. खेळताना दबाव नेहमी राहतो आणि तुम्हाला त्या प्रेशर कंडिशनचा आनंद घेता आला पाहिजे, असंही शाहिद अफ्रिदी म्हणतो.


पाकिस्तानचा संघ भारतात जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केलीये. लोक म्हणतात की, पाकिस्तान संघाला विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी भारतात नाही गेलं पाहिजे. वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकला पाहिजे. मात्र, मला तसं वाटत नाही. आपण भारतात गेलं पाहिजे आणि जिंकून परत आलं पाहिजे, असं शाहिद अफ्रिदी (Shahid Afridi On Stone Pelting) म्हणाला आहे.


आणखी वाचा - Virat Kohli Dance: आग लगे बस्ती में, कोहली अपनी मस्ती में.., विराटचा मजेशीर Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!


आशिया कपचा (Asia Cup 2023) सामन्यासाठी हायब्रिड मॉडेलला आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मान्यता दिल्याने आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे. त्यानंतर भारतात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला वर्ल्ड कपमध्ये भिडत होणार आहे.


दरम्यान, शाहिद आफ्रिदी याची मुलगी अक्सा आफ्रिदी हिचं 7 जुलै रोजी लग्नसोहळा पार पडला. कराचीच्या आलिशान हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा (Shahid Afridi Daughter Wedding) पार पडला. अशातच आता शाहिद अफ्रिदीने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावेळी त्याने लेकीसाठी भावनिक पोस्ट (Shahid Afridi Emotional Post) देखील लिहिली आहे.