मुंबई: विराट कोहलीने टी 20 वर्ल्ड कपआधीच आपण टी 20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडणार असल्याचं ट्वीट करून जाहीर केलं होतं. त्यानंतर आता कोहली उत्तम कॅप्टन नसून त्याने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करावं अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. आता पाकिस्तानच्या खेळाडूनं देखील विराट कोहली नाही तर टीम इंडियाचा उत्तम कर्णधार कोण होऊ शकतो यावर वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणतो की विराट कोहलीनं सर्व फॉरमॅटचं कर्णधारपद सोडायला हवं. त्याने आपल्या फलंदाजीवर फोकस करायला हवं. वन डे आणि कसोटी फॉरमॅटमधील कर्णधारपदही विराटने सोडावं असं शाहिद म्हणाला आहे. आफ्रिदीच्या मते, विराटने हे केले तर तो फलंदाज म्हणून आणखी चांगली कामगिरी करू शकेल.


'समा टीव्ही चॅनल'शी बोलताना आफ्रिदी म्हणाला, विराट कोहली भारतीय क्रिकेटसाठी एक उत्तम फलंदाज आहे. त्यामुळे त्याला फलंदाजीवर फोकस करू द्यावा. विराट कोहली एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. मनावर इतर कोणतेही दडपण न ठेवता खेळण्याचा आनंद घेऊ शकतो. 


विराट कोहलीनं उर्वरित फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले तर तो फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करू शकतो. विराट कोहलीला आपल्या फलंदाजीवर लक्ष्य देण्यासाठी कर्णधारपद सोडायला हवं असं मत शाहिन आफ्रिदीने व्यक्त केलं आहे.