Virat-Jadeja Jhoome Jo Pathan Dance Video SRK Reacts: बॉलीवूड अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजावर (Ravindra Jadeja) फिदा झाला आहे. शाहरुखने विराट आणि जडेजाकडून आपल्याला शिकवणीची गरज असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान नागपूरमध्ये बॉर्डर-गावस्कर चषकाच्या पहिल्याच कसोटी सामन्यादरम्यानचा विराट आणि जडेजाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही कसोटी भारतीय संघाने एका डावाने जिंकली. केवळ तीन दिवसांमध्ये हा कसोटी सामना संपला. या सामन्यादरम्यान कोहली आणि जडेजाने मैदानावरच केलेला डान्स सध्या सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. शाहरुखनेही या डान्सचं कौतुक केलं आहे. शाहरुखच्या एका चाहत्याने त्याला या व्हिडीओवर प्रतिक्रिया देण्यास सांगितलं असताना शाहरुखने या डान्सवर आपलं मत नोंदवलं.


कोणता व्हिडीओ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेला हा व्हिडीओ भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशीचा आहे. भारतीय संघ दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याची वाट पाहत होता. त्यावेळी भारतीय संघाचे खेळाडू बॉण्ड्री लाइनजवळ उभे होतो. तेव्हाच विराट कोहली शाहरुखवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यावर डान्स करताना दिसला. विराटला पाहून जडेजाही नाचू लागला. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून व्हायरल झाला आहे.



यावर शाहरुख काय म्हणाला?


शाहरुख खानने व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी सोशल मीडियावर #AskSRK अंतर्गत चाहत्यांशी गप्पा मारल्या. यामध्ये शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी त्याला प्रश्न विचारले. एका चाहत्याने विराट कोहली आणि रवींद्र जडेजा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटातील 'झुमे जो पठाण' गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत चाहत्याने या डान्सबद्दल शाहरुखचं म्हणणं काय? असं विचारलं. यावर शाहरुखने तो व्हिडीओ रिट्वीट करत, "हे माझ्यापेक्षा जास्त चांगला डान्स करत आहेत. मला विराट आणि जडेजाकडून हे (हा डान्स) शिकावं लागेल," अशी प्रतिक्रिया शाहरुखने नोंदवली.



नागपूर कसोटीमध्ये जडेजाने 5 विकेट्स घेण्याबरोबरच अर्धशतक झळकावलं. जडेजाला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आलं.