मुंबई: मैदानात सामन्यादरम्यान वादविवाद होत असतात. अशावेळी खेळाडूंचा संताप अनावर होतो आणि मारहाणीपर्यंत प्रकार घडतात. मात्र एका खेळाडूनं चक्क गैरवर्तन करत अंपायरला लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा लाजीरवाणा प्रकार बांग्लादेशच्या ऑलराऊंडर खेळाडूनं केला आहे. सामन्या दरम्यान त्याने स्टंप फेकून दिले आणि अंपायरला लाथ मारली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाकिब अल हसनने या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवरुन दिलगिरी व्यक्त केली. त्याने ट्विट केले की, 'आजच्या सामन्यात माझ्या वर्तनासाठी मी माफी मागतो. माझ्यासारख्या अनुभवी क्रिकेटपटूकडून हे असं घडणं हे अजिबातच योग्य नाही. परंतु कधीकधी सामन्याच्या तणावपूर्ण वातावरण असतं अशावेळी तणावामुळे संताप सुटतो. अशा चुकांबद्दल मी सर्व संघ, स्पर्धेत सहभागी सर्व अधिकारी आणि आयोजन समितीची दिलगिरी व्यक्त करतो.' 




ढाका प्रीमियर लीग 2021 मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब विरुद्ध अभानी लिमिटेड सामना सुरू होता. या सामन्यात शाकिब अल हसनने एकदा नाही तर दोन वेळा गैरवर्तन केलं. गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या हसननं अंपायरने आऊट दिलं नाही म्हणून चिडलेल्या हससनं लाथ मारली. हसनचं वर्तन अत्यंत लाजीरवणं होतं. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.