NZ vs BAN: आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ( ICC Cricket World Cup ) मध्ये न्यूझीलंडच्या टीमची कामगिरी यंदा उत्तम होताना दिसतेय. शुक्रवारी बांगलादेश विरूद्ध झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेट्स विजय झाला. यासह किवींच्या टीमने विजयाची हॅट्रिक नोंदवली आहे. मात्र दुसरीकडे बांगलादेशाच्या टीमला काही खास कामगिरी करता आलेली नाही. 3 सामन्यांमध्ये बांगलादेशाच्या टीमला केवळ एकदाच विजय मिळवणं शक्य झालं आहे. दरम्यान न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या पराभवानंतर बांगलादेशाचा कर्णधार शाकिब-अल-हसन ( Shakib Al Hasan ) पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये दिसला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडनंतर बांगलादेशाच्या टीमचा न्यूझीलंडने पराभव केला. 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात 8 विकेट्सने बांगलादेशाच्या टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं. या दारूण पराभवानंतर पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये शाकिब-अल-हसन ( Shakib Al Hasan ) समोर आला नाही. तर त्याने आपल्या जागी नझमुल हसन शांतोला पाठवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. 


पराभवानंतर शाकिब का आला नाही समोर?


न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर, शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan ) नझमुल हसन शांतोला ( Najmul Hossain Shanto ) त्याच्या जागी पाठवलं. यावेळी शांतोने शाकीबच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट केले. शांतो म्हणाला, “शाकिब त्याच्या स्कॅनसाठी गेला आहे. त्यानंतर आम्हाला माहिती मिळणार आहे. या सामन्यात आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आमची सुरुवात चांगली झाली नाही. शेवटच्या सामन्यातही आम्ही पहिल्या 10-15 ओव्हर्समध्ये खराब फलंदाजी केली. 


शांतो ( Najmul Hossain Shanto ) पुढे म्हणाला की, पहिल्या 10-15 ओव्हर्समध्ये आम्ही थोडी सावध फलंदाजी केली तर आम्ही चांगली कामगिरी करू शकतो. दरम्यान वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. माझ्या मते सर्वात मोठी सुधारणा आमच्या वेगवान गोलंदाजीत झालीये. आम्हाला आता चांगली फलंदाजी करायची आहे.”


शाकिबने सांभाळला बांग्लादेशाचा डाव


न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात बांगलादेशाच्या ओपनर फलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. शाकिब आणि मुशफिकुर रहीम यांनी डाव सांभाळला. शाकिबने 51 बॉल्समध्ये 40 रन्सचं योगदान दिलं. याशिवाय मुशफिकुर रहीमनेही ६६ रन्सची खेळी केली. 


या सामन्याबद्दल न्यूझीलंडने टॉस जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरवलं. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 245 रन्स केले. न्यूझीलंडच्या टीमने कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेलच्या खेळीच्या जोरावर सहज विजय मिळवला.