Asia Cup पूर्वी `हा` स्टार खेळाडू अडकला वादात, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण
सट्टेबाजांशी संबंधित प्रकरणाची चौकशी, `हा` स्टार खेळाडू आहे तरी कोण?
मुंबई : आशिया खंडातले सर्व क्रिकेट बोर्ड आशिया कपसाठी आपआपला संघ जाहीर करत आहेत. संघ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरु असताना हा स्टार खेळाडू वादात सापडल्याची घटना घडलीय. हा वाद नेमका काय आहे व हा स्टार खेळाडू आहे तरी कोण ते जाणून घेऊय़ात.
बांगलादेशचा सर्वात मोठा स्टार क्रिकेटर शकिब अल हसन पुन्हा वादात सापडला आहे. कारण त्याच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने बेटिंग कंपनीच्या समर्थनार्थ त्याच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) अष्टपैलू खेळाडूच्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टची चौकशी करेल ज्याने "बेटविनर न्यूज" नावाच्या कंपनीसोबत भागीदारी जाहीर केली आहे. बांगलादेशच्या सध्याच्या नियमांनुसार, कोणत्याही प्रकारच्या बेटिंग क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे किंवा समर्थन करणे प्रतिबंधित आहे.
बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी सांगितले की, शाकिबला कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. ते पुढे म्हणाले, 'दोन गोष्टी आहेत. अशी परवानगी आम्ही देणार नसल्याने पहिली परवानगी घेण्याची शक्यता नाही. आम्ही सट्टेबाजीशी संबंधित काहीही होऊ देणार नाही. याचा अर्थ त्यांनी आम्हाला परवानगी देण्यास सांगितले नाही. दुसरे म्हणजे, त्यांनी करारावर स्वाक्षरी केली आहे की नाही हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे.
दरम्यान या प्रकरणावर शकिब अल हसनची चौकशी होत आहे. या चौकशीतून काय बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.