FIFA World Cup 2022: क्रिकेटचा वर्ल्डकप या आठवड्यात संपणार असून सर्वांना वेध लागले आहे ते फिफा वर्ल्डकप 2022 चे..यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप कतारमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 20 नोव्हेंबरला होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात कोलंबियन पॉपस्टार शकिरा (Shakira), इंग्लंडची दुआ लिपा आणि बॉलिवूड स्टार नोरा फतेही (Nora Fatehi) परफॉर्म करणार आहे. नोरा शकीरा आणि जेनिफर लोपेझ यांच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. शकीराने 2010 च्या फिफा वर्ल्डकपचे 'वाका-वाका' गाणं गायलं होतं. जेनिफर लोपेझ ब्राझीलमध्ये 2014 च्या फीफा वर्ल्डकपच्या (FIFA World Cup) अँथम गाण्यात 'वुई आर वन'मध्ये रॅपर पिटबुलसोबत दिसली होती. फिफा विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण पूर्व आशियाचे प्रतिनिधित्व करणारी नोरा ही एकमेव अभिनेत्री आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 उद्घाटन सोहळा 20 नोव्हेंबर रोजी अल खोर येथील अल बाईत स्टेडियमवर होणार आहे. हा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम पहिल्या सामन्याच्या दोन तास आधी होणार आहे. त्यानंतर पहिला सामना कतार आणि इक्वेडोर यांच्यात रात्री 9.30 वाजता होणार आहे.



फीफा वर्ल्डकप तिकीट दर


या स्पर्धेच्या ग्रुप स्टेज सामन्यासाठीचं तिकिट दर 53 हजार ते 4.79 लाख रुपये इतका आहे. प्री-क्वार्टर फायनलची किंमत 37 हजार ते 18 लाख रुपये या दरम्यान आहे. तर क्वार्टर फायनलसाठी तिकीट 47 हजार ते 3.40 लाख रुपये आहे. सेमी फायनल सामन्यासाठीचं तिकीट 77 हजार ते 3.5 लाख रुपयांपर्यंत आहे. तर फायनलसाठीचं तिकीट 2.25 लाख ते 13.39 लाखाच्या दरम्यान आहे.