शमीने म्हटलं, पत्नीवर एका वर्षात केले इतके कोटी खर्च
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलाय.
मुंबई : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलाय.
पत्नी हसीन जहॉने त्याच्यावर अनैतिक संबंधांपासून ते मॅच फिक्सिंगपर्यंतचे गंभीर आरोप केले. दरम्यान शमीनेही बायकोवर धक्कादायक आरोप केले आहेत.
शमीने म्हटलं की, 'हसीन नेहमी शंका घ्यायची. आरोप लावणं तिचा शौक आहे. हसीनला दुबईमधील माझा गतीविधी माहित होत्या. माझ्याकडे पुरावा म्हणून व्हॉट्सअॅपवरचे मॅसेज देखील आहे.'
शमीने पुढे म्हटलं की, 'हसीनने दुबईवरुन डायमंड आणि सोनं मागवलं होतं. मी हसीनला सप्राइज देण्यासाठी वीजा घेतला. कोणीतरी माझ्या पत्नीला भडकवतंय. मला हसीनचा तलाक झाला आहे हे लग्नानंतर कळालं. तरी मी तिच्या मुलींचा सांभाळ केला.
शमीने आरोप केले की, हसीनवर त्याने वर्षभरात दीड कोटी खर्च केले. ती माझ्या कार्डमधून शॉपिंग करायची. मी नेहमी माझ्या परिवाराची जबाबदारी घेतली. जर मी गुन्हेगार ठरलो तर मला फाशी द्या'