मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची बायको सध्या त्यांच्यातील वादामुळे चांगलेच चर्चेत आहेत. हसीन जहांने शमीवर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे आरोप केलेत. दरम्यान, शमीने मात्र हे सारे आरोप फेटाळून लावलेत. हसीनने केलेल्या आरोपांमुळे बीसीसीआयने शमीसोबतचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केले नव्हते. मात्र नंतर हे आरोप सिद्ध न झाल्याने बीसीसीआयने कॉन्ट्रॅक्ट रिन्ये केले तसेच त्याचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे वाद सुरु असतानाच २५ मार्चला शमीला रस्ते अपघातात दुखापत झाली. डेहराडून येथून दिल्लीला परतत असताना त्याच्या कारला अपघात झाला. या अपघातात शमीच्या हाताला आणि डोक्याला जखम झाली. शमीच्या डोळ्याजवळ ५ टाकेही पडले. शमी जखमी झाल्यानंतर हसीन जहांने तिला फोन करुन विचारले नाही. शमीला याचे खूप दु:ख झाले. 


एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शमी म्हणाला, अपघात झाल्यानंतर माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी माझे हितचिंतक, मित्रांनी आणि नातेवाईकांनी फोन केले. मला आशा होती की हसीन जहाही कॉल करेल. मला अथवा माझ्या नातेवाईकांकडे माझ्या तब्येतीची चौकशी करेल. मात्र तिने असे काही केले नाही. शमी पुढे म्हणाला, हसीन इतकी स्वार्थी असेल असे वाटले नव्हते. याचे दु:ख मात्र कायम मनात सलत राहील.