Shane Warne | शेन वॉर्न 100 शतकं ठोकणाऱ्या सचिनला महान फलंदाज मानायचा नाही
फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचं (Shane Warne Death) वयाच्या 52 वर्षी निधन झालं. वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली आहे.
मुंबई : फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचं (Shane Warne Death) वयाच्या 52 वर्षी निधन झालं. वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाची मोठी हानी झाली आहे. क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. वॉर्नने आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीने चकवलं. मात्र त्याला सचिन तेंडुलकरला काही आपल्या फिरकीत फारसं फसवता आलं नाही. वॉर्नने काही दिवसांपूर्वी सचिनबाबत वक्तव्य केलं होतं. सचिन माझ्या दृष्टीने कसोटीतील सर्वोत्तम बॅट्समनपैकी नसल्याचं वॉर्न म्हणाला होता. (shane warne did not consider sachin tendulkar great who scored 100 centuries)
माझ्या दृष्टीनं 100 शतकं ठोकणारा सचिन हा सर्वात बेस्ट खेळाडू नाही असं विधान वॉर्नने केलं होतं. तसेच त्याने कसोटीमधील 5 बेस्ट क्रिकेटपटू कोण आहेत याची देखील नावं सांगितली होती. यामध्ये एका भारतीय खेळाडूचं नाव देखील होतं.
क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरने एकामागे एक शतक ठोकले होते. त्याच्या कामगिरीचं कौतुक आजही होत. मात्र वॉर्न त्या मताशी सहमत नव्हता.
सचिन तेंडुलकर हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं ठोकली आहेत. सचिनने 200 हून अधिक कसोटी सामने खेळले. कसोटीत 51 शतके आणि 15,921 पेक्षा जास्त धावा केल्या. शेन वॉर्नच्या नजरेत या विक्रमांनाचं कवडीमोलही महत्त्व नसल्याचं त्याच्या बोलण्यातून दिसून आलं.
शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेख केलेल्या 5 बेस्ट फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकरलाही स्थान दिलं नव्हतं. शेन वॉर्नने सध्याच्या काळातील टॉप-5 कसोटी क्रिकेटपटूंची नावं सांगितली होती. यामध्ये एकमेव भारतीय फलंदाज विराट कोहलीला स्थान दिलं होतं.
शेन वॉर्नचे टॉप 5 बॅट्समन
केन विलियमसन
मार्नश लाबुशेन
स्टीव स्मिथ
विराट कोहली
जो रूट