Shardul Thakur vs BCCI : टीम इंडियाचा ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेशाविरूद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. परंतु भारत आणि बांगलादेश (BAN vs IND) यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) बेंचवर बसवण्यात आलं आहे. दरम्यान यावरून शार्दूल ठाकूरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त ट्विट (Controversial Tweets) केले. मुख्य म्हणजे, शार्दूल चाहत्यांशी सहमत असल्याचंही दिसून येतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलाविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात शार्दूल ठाकूरला टीममध्ये समाविष्ट केलं नाही. यानंतर शार्दूलला पाठिंबा देत बीसीसआय विरोधात काही ट्विट्स केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, शार्दूलने हे ट्विट्स लाईक केल्याने एकच गदारोळ माजलाय. त्याने हे ट्विट्स लाईक केल्याने, असा अंदाज लावला जातोय की, ड्रेसिंग रूममध्ये त्याच्याविरोधात काहीतरी कट केला जातोय.


Shardul Thakur ने लाईक केले वादग्रस्त ट्विट 


टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात उत्तम गोलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादवला दुसऱ्या टेस्टमध्ये बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ज्यानंतर चाहत्यांनी टीम मॅनेजमेंटच्या टीम सिलेक्शनवर चांगलेत ताशेरे ओढले. यानंतर आता ऑलराऊंडर शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) ला बांगलादेशाच्या टेस्ट सामन्यात समाविष्ट केलं नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


फॅन्सने केलेले वादग्रस्त ट्विट्स शार्दूलने लाईक केले आहेत. यावेळी एका युझरने म्हटलंय, "बेंच गरम करण्यापेक्षा रणजी ट्रॉफी खेळ. तू आत सुरु असलेल्या राजकारणाचा शिकार झाला आहेस. आशा आहे की, तू उत्तम पद्धतीने कमबॅक करशील." अजून एका युझरने सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित करत, टीमची निवडीत ट्विटर ट्रेंडचा प्रभाव दिसून येत असल्याचं म्हटलंय.



टीम इंडियासमोर इतक्या धावांचे लक्ष्य 


बांगलादेशने टीम इंडियासमोर (Bangladesh vs India) विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेला टीम इंडियाचा (Team India) डाव चांगलाच गडगडला आहे. टीम इंडियाचे 4 खेळाडू 45 धावावर आऊट झाले आहेत. तर सध्या जयदेव उनाडकट (3 धावा) आणि अक्षर पटेल (26 धावा) करून मैदानावर आहेत. 


मेहदी हसनची कमाल


बांगलादेशच्या (Bangladesh vs India) मेहदी हसन (Mehidy Hasan) मिराजने चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि शुभमन गिल या बड्या विकेट घेतल्या आहेत. तर शाकिब अल हसनने केएल राहुलला लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टीम इंडियाच्या सध्या 45 धावावर 4 विकेट पडल्या आहेत.