Shardul Thakur Wedding : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मराठमोळा शार्दुल ठाकूर विवाहबंधनात (Shardul Thakur Marriage) अडकला आहेत. मिताली पारुलकरसोबत (Shardul Thakur Wife) त्याने लग्नगाठ बांधली. सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेक भारतीय क्रिकेटपटूही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. अशातच आता शार्दुल देखील क्लिन बोल्ड झालाय. कर्जत येथील एका फार्महाऊसवर कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक क्रिकेटरांनी हजेरी लावली होती. अशातच लग्नाच्या आधीचा एक व्हिडिओ (Shardul Thakur Wedding Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय.


शार्दुल लग्नाच्या बेडीत अडकला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर या वर्षी लग्न करणारा लॉर्ड शार्दुल हा तिसरा भारतीय खेळाडू आहे.  अनेक वर्ष डेट केल्यानंतर शार्दूलने लग्नाचा निर्णय घेतला आणि अखेर आज हा लग्नसोहळा संपन्न झाला आहे. दोघांच्या कुटुंबातील 200 ते 250 जण उपस्थित राहिले होते.


श्रेयस अय्यरचा कल्ला


श्रेयस अय्यर, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक तोमर यांच्यासह अनेक क्रिकेटर्सने लग्नाला हजेरी लावली होती. लग्नापूर्वी संगीत समारंभ पार पडला. त्यावेळी श्रेयस अय्यर आपलं अनोखं टॅलेन्ट दाखवताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये शार्दुल आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer Sing a Song) बॉलिवूडचे प्रसिद्ध रोमँटिक गाणे ‘तुम जो मेरा साथ दो’ गाताना दिसत होते. 


हा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आणि चाहत्यांनीही त्यावर भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकीकडे अय्यर गाणं गात असताना दुसरीकडे शार्दुल मिताली डान्स करताना दिसत आहेत. 


पाहा Video -



शार्दुलचा झिंगाट डान्स


लग्नसमारंभाआधी हळदीचा कार्यक्रम वाजतगाजत पार पडला. हळदीच्या कार्यक्रमानंतर शार्दुल झिंगाट गाण्यावर ताल धरताना दिसला होता. त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शार्दुल ठाकूर यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून (DC) खेळणार आहे.


कोण आहे शार्दुलची पत्नी मिताली पारुलकर?


शार्दुल आणि मिताली परुलकर (Mitali Parulkar) यांची नोव्हेंबर 2021 मध्ये सारखपुडा झाला होता. 15 महिन्यांनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मिताली पारुलकर ही एक बिझनेसवुमन (Businesswoman) आहे आणि मुंबईजवळील ठाण्यातील ऑल द बेक्स या स्टार्टअपची मालकीण आहे. कोरोना काळात त्यांचा लग्नाचा प्लॅन होता. मात्र, त्यावेळी कोरोनामुळे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.