Ind vs Eng : शार्दुल ठाकूरचा जबरदस्त सिक्स, बॅट पाहण्यासाठी पोहोचला बेन स्टोक्स
शार्दुल ठाकूरची जबरदस्त इनिंग
पुणे : इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या वनडे सामन्यात ऑलराऊंडर शार्दुल ठाकुरने 3 सिक्स ठोकले. त्यामधील एक सिक्स हा इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सच्या बॉलिंगवर लगावला. त्यानंतर बेन स्टोक्स हा चक्क त्याची बॅट पाहण्यासाठी पोहोचला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावादरम्यान भारतीय संघाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूरने डावात तीन षटकार ठोकले.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या तिसर्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात सर्व विकेट गमावून शिखर धवन,ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने अर्धशतक झळकावत भारतीय संघाने 329 धावा केल्या. त्याचवेळी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरनेही फलंदाजीने आपले योगदान दिले. त्याने 21 बॉलमध्ये 1 फोर आणि 3 सिक्ससह एकूण 30 धावा केल्या.
बेन स्टोक्स इंग्लंडच्या डावातील 45 वी ओव्हर टाकत होता. चौथ्या बॉलवर शार्दुल ठाकूर पुढे गेला आणि त्याने जबरदस्त शॉट मारला. हे पाहून बेन स्टोक्स आश्चर्यचकित झाला.